ETV Bharat / bharat

'ही' दोन राज्ये वगळता देशभरातील प्रवासी विमान वाहतूक होणार सुरू

आंध्र प्रदेशमधील प्रवासी विमान वाहतूक २६ मेपासून, तर पश्चिम बंगालमधील २८ मेपासून सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त इतर राज्यांमधील प्रवासी विमान वाहतूक उद्यापासून सुरू होईल. तसेच, महाराष्ट्रातील इतर विमानतळांच्या एक तृतीयांश विमान वाहतूक मुंबईमधील विमानतळावरून करण्यात येणार आहे.

author img

By

Published : May 24, 2020, 10:45 PM IST

Domestic passenger flights to resume on Monday except for these two states
'ही' दोन राज्ये वगळता देशभरातील प्रवासी विमान वाहतूक होणार सुरू..

नवी दिल्ली - २५ मेपासून प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा यापूर्वी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केली होती. याबाबत कित्येक राज्यांनी आक्षेप घेतला होता, तर काहींनी आणखी मुदत मागितली होती. या सर्व राज्यांशी चर्चा केल्यानंतर, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश वगळता इतर राज्यांमधील प्रवासी विमान वाहतूक उद्यापासून (२५ मे) सुरू करण्यात येणार असल्याचे पुरी यांनी आज जाहीर केले आहे.

आंध्र प्रदेशमधील प्रवासी विमान वाहतूक २६ मेपासून, तर पश्चिम बंगालमधील २८ मेपासून सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त इतर राज्यांमधील प्रवासी विमान वाहतूक उद्यापासून सुरू होईल. तसेच, महाराष्ट्रातील इतर विमानतळांच्या एक तृतीयांश विमान वाहतूक मुंबईमधील विमानतळावरून करण्यात येणार आहे.

आंध्र प्रदेशमध्येही काही प्रमाणातच विमान वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. तसेच, तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये येणाऱ्या विमानांवर दिवसाला २५ फ्लाईट्सची मर्यादा घालण्यात आली आहे. तेथून निघणाऱ्या विमानांवर मात्र अशी कोणतीही मर्यादा नाही. तर, तामिळनाडूमधील इतर विमानतळांवरून देशातील इतर भागात असणारेच नियम लागू राहणार आहेत.

हेही वाचा : तेलंगणातून आत्तापर्यंत 2 लाख परप्रांतीय पोहोचले घरी, तर बिहारमधून 300 कामगार परत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.