थ्रिसुर(केरळ)- प्राणी संवर्धन सेवा संस्थेच्या स्वयंसेवकांनी एका कुत्र्याला जीवदान दिले आहे. कुत्र्याच्या तोंडाला टेप गुंडाळण्यात आला होता. ही घटना थ्रिसुर जिल्ह्यातील ओलूर येथे घडली आहे. प्राणी संरक्षणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी कुत्र्याला प्राणी निवारागृहात पाठवले आहे. स्वयंसेवकांनी कुत्र्याला सोडवले नसते तर त्याच्यावर मृत्यू ओढावण्याची शक्यता होती.
गेल्या काही दिवसांत केरळमध्ये दोन हत्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. पलक्कड मध्ये गर्भवती हत्तीणीचा स्फोटक असणारे फळ खाल्ल्याने मृत्यू झाला होता. मलापुरम येथील उत्तर निलांबूर वनविभागाच्या हद्दीत एक हत्ती गंभीर जखमी झाल्यामुळे मृतावस्थेत सापडला होता.