ETV Bharat / bharat

संतापजणक..! पोलिसांनी केली डाॅक्टरांना मारहाण... रुग्णालयातून जात होते घरी - भोपाल पोलीस

अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेत असलेल्या डाॅक्टरांना पालिसांकडून मारहण झाल्याची घटना घडली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये काम करणाऱ्या दोन डॉक्टरांवर रुग्णालयातून घरी परत येत असताना, पोलिसांनी मारहाण केली आहे.

doctors-attacked-by-police-while-returning-home-after-work

author img

By

Published : Apr 11, 2020, 10:41 AM IST

भोपाळ- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लागू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेत असलेल्या डाॅक्टरांना पालिसांकडून मारहण झाल्याची घटना घडली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये काम करणाऱ्या दोन डॉक्टरांवर रुग्णालयातून घरी परत येत असताना, पोलिसांनी मारहाण केली आहे.

हेही वाचा- #लाॅकडाऊन: वाहतूक ठप्प..! राज्यातील वाहनचालकांवर उपासमारीची वेळ

पीडित डाॅक्टरांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, आम्ही रुग्णालयातील कामकाज करुन घरी येत होतो. दरम्यान, रस्त्यात आम्हाला पोलिसांनी अडवले. आमच्याशी हुज्जत घातल आम्हाला मारहाण केली. आम्ही ओळखपत्र दाखवले. त्यावर स्पष्ट अक्षरात डाॅक्टर असा उल्लेख होता. आमच्या गाडीवरही डाॅक्टरचे स्टिकर होते. मात्र तरीह पोलिसांनी हे कृत्य केले. विशेष म्हणजे या दोन डाॅक्टरपैकी एक महिला डाॅक्टर आहे.

घटनेनंतर डाॅक्टरांनी रुग्णालयात उपचार घेतले. रुग्णालयातील वरिष्ठांना हा प्रकार सांगून त्या पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली.

दरम्यान, दोन आठवड्यांपासून कोरोनाव्हायरसच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारत लॉकडाऊनमध्ये आहे. परंतु, डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांना यातून सूट देण्यात आली आहे. तरिही त्यांना पोलिसांकडून मारहाण होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.