ETV Bharat / bharat

गरीबीमुळे दिव्यांग जलालुद्दीनच्या स्वप्नांना ब्रेक, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडे मागितली मदत

author img

By

Published : May 28, 2020, 3:08 PM IST

जलालुद्दीन सहा वर्षांचा असतानाच एका रेल्वे दुर्घटनेत त्याला आपला पाय गमवावा लागला. यानंतरही त्याने माघार न घेता सायकल चालवण्याचा सराव सुरू ठेवला. 2016 मध्ये लखनौमधील एका सायकल स्पर्धेत त्याने 12 तास सायकल चालवली. यात त्याने 300 किलोमीटर सायकल चालवत रेकॉर्ड पूर्ण केले.

Jalaluddin of darbhanga set a record in cycling
गरीबीमुळे दिव्यांग जलालुद्दीनची स्वप्ने थांबली

दरभंगा - आपल्या आजारी वडिलांना सायकलवरुन गुरुग्रामहून दरभंगाला आणणारी धाडसी मुलगी ज्योती हिचे गाव आज जगभर प्रसिद्ध झाले आहे. ज्योतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज ज्योतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सर्वांच्या दरम्यान ज्योतीच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकटार गावच्या दिव्यांग जलालुद्दीनची स्वप्ने अजूनही त्याच्या डोळ्यातच आहेत. आपल्या स्वपांनानाही वाट सापडेल, या आशेवर तो आहे.

जलालुद्दीन सहा वर्षांचा असतानाच एका रेल्वे दुर्घटनेत त्याला आपला पाय गमवावा लागला. यानंतरही त्याने माघार न घेता सायकल चालवण्याचा सराव सुरू ठेवला. 2016 मध्ये लखनौमधील एका सायकल स्पर्धेत त्याने 12 तास सायकल चालवली. यात त्याने 300 किलोमीटर सायकल चालवत रेकॉर्ड पूर्ण केले.

कुटुंबाची दयनीय अवस्था -

जेव्हा नशीब चांगले असते तेव्हाच प्रोत्साहन आणि धैर्य रंग आणतात. गरीबीमुळे जलालुद्दीन आज त्या टप्प्यावर पोहोचू शकला नाही. आई बिस्कीटे विकून घर चालवते. तर, दिव्यांग जलालुद्दीन आपल्या जुन्या सायकलवर एका पायाने अजूनही सराव करत आहे. तो अजूनही एका चांगल्या सायकलच्या प्रतीक्षेत आहे.

2019 मध्ये इंडोनेशियात दिव्यांगसाठी आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत त्याची निवड झाली. मात्र, संसाधनाच्या अभावामुळे तो देशाचे प्रतिनिधित्व करू शकला नाही. २०११ मध्ये दरभंगा जिल्हा स्थापना दिनानिमित्त सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात सामान्य मुलांमध्ये दिव्यांग जलालुद्दीन 14 व्या स्थानी होता. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. मुजफ्फरपुर, पटना, अहमदाबाद, हैदराबाद आणि लखनऊमध्ये त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. मात्र, परिस्थिती आणि साधनांच्या कमीने त्याला जास्त पुढे जाण्याची संधी नाही दिली.

ईटीव्ही भारतशी बोलताना जलालुद्दीन म्हणाला, की निवड झाली असूनही 2019 मध्ये तो इंडोनेशियात देशासाठी खेळू शकला नाही याचा त्याला खेद आहे. त्याने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाला ज्योतीसारखीच काही संसाधने आपल्यालाही उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. जेणेकरुन तोदेखील सायकलिंगमध्ये देशाचे नाव कमवेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.