नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ वाद निर्माण झाला आहे. या वादाला सोमवारी (दि. 8 जून) विराम मिळाला आहे. चीनने सीमेवरून आपल्या सैन्याला मागे बोलविले आहे. मात्र, या वादावर सध्यातरी कोणताही तोडगा निघाला नाही.
चीनच्या घुसखोरीनंतर भारत आणि चिनी सैन्यामध्ये लखाडच्या पँगाँग तलावाजवळ अनेक चकमकी झाल्या. यामध्ये सुमारे दोन्ही बाजुचे 75 सैनिक जखमी झाले होते.
या चकमकीनंतर लेह येथील 14 व्या कोरचे कमांडर लेफ्टनेंट जनरल हरेंद्र सिंह आणि पीएलएचे दक्षिण झिंजियांग सैन्यचे कमांडर मेजर जनरल लिन लियू यांच्यात 6 जून रोजी बैठक झाली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार (दि. 10 जून) पुन्हा ब्रिगेड कमांडर आणि स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तरीह सर्व सुरळीत व्हायला वेळ लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. सुत्रांकडे या वादाचे मुख्य कारण विचारले असता, सीमावर्ती भागावर चीनकडून तंबू लावले जात होते. याचाच अर्थ त्यांच्याकडून अनावश्यकपणे घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे, हे स्पष्ट होते आणि हाच या वादाचा महत्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.
जर भारताला सीमावर्ती भागात विकास कामे करायची असतील तर चीन याला विरोध करेल. यामुळे पायाभूत सुविधेच्या मुद्द्यावर चर्चा होईल. चीन सीमावर्ती भागावरील भारतातील रस्ते कामांना विरोध करत आहे. मात्र, भारताकडून रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पूर्व लडाख येथील रस्ते निर्मितीसाठी 12 हजार मजूर आणण्याचे शासनाने ठरवले आहे. 2022 मध्ये सीमावर्ती भागातील रस्ते पूर्ण करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. चीनने यापूर्वी भारताच्या सीमेच्या नियंत्रण रेषेपर्यंत (एलसी) रस्ते निर्माण केले आहेत. पण, भारताच्या विकास कामांध्ये चीनकडून आडकाठी घातली जात आहे.
अंदाजे ऑक्टोबरपर्यंत दोन्ही देशाचे सैन्यदल सीमावर्ती भागातून माघार घेतील. कारण, त्यानंतर या ठिकाणचे तापमान प्रचंड घसरते. हिवाळ्यात येथील तापमान उणे 20 अंश सेल्सिअसपर्यंत असते,अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - गेल्या 24 तासात देशात आढळले नवे 9 हजार 985 रुग्ण; तर 279 जणांचा बळी