ETV Bharat / bharat

पॅँगाँगमधून सैनिक मागे घ्यावेत ; चर्चेच्या पाचव्या फेरीत भारताची चीनकडे मागणी

author img

By

Published : Aug 3, 2020, 1:32 PM IST

पॅनगॉँग त्सो परिसरात 5 मे रोजी दोन्ही सैन्यदलात हिंसक वाद उद्भवला होता. त्यामुळे चीन आणि भारतामध्ये चर्चेसाठी पाचवी फेरी घेण्यात आली.

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली – भारतीय कॉर्प्स कमांडर आणि चीनमधील चर्चेची पाचवी फेरी रविवारी सायंकाळी साडेनऊ वाजता संपली. ही बैठक दहा तासांहून अधिक तास चालली होती. भारताच्यावतीने पॅँगाँग त्सो तलाव क्षेत्रामधून चीनी सैन्यदलाच्या तुकड्या मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.

चीनच्या प्रत्यक्ष ताबारेषेनजीक असलेल्या मोल्डो येथे भारतीय कॉर्प्स कमांडरने चीनच्या अधिकाऱ्यांसमेवत चर्चा केल्याचे सूत्राने सांगितले.

चीन प्रामाणिकपणे सैन्य मागे घेत तणावाची स्थिती कमी करेल-भारत

पूर्व लडाखमधील ताबारेषेजवळून चीनचे सैनिक मागे घेण्याच्या प्रक्रियात काही सुधारणा झाल्याचे भारताने 30 जुलैला म्हटले होते. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याचेही भारताने म्हटले होते. चीन प्रामाणिकपणे सैन्य मागे घेत तणावाची स्थिती कमी करेल, अशी भारताने अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामधून दोन्ही देशांच्या सीमारेषेनजीक लवकरात लवकर संपूर्ण शांतता प्रस्थापित होईल, असे भारताने म्हटले होते.

हिंसक वादामुळे चर्चेची पाचवी फेरी

पॅँगाँग त्सो परिसरात 5 मे रोजीदोन्ही सैन्यदलात हिंसक वाद उद्भवला होता. त्यामुळे चीन आणि भारतामध्ये चर्चेसाठी पाचवी फेरी घेण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भारत-चीनच्या सीमारेषेबाबतच्या तणावाबाबत दोन्ही देशांनी आढावा घेतल्याचे म्हटले होते.

15 जूनपासूून दोन्ही देशात तणावाची स्थिती-

गलवान खोऱ्यात 15 जूनला चीनच्या सैनिकांबरोबर झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले आहे. तर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार चीनच्या 35 जवानांना वीरमरण आले आहे. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाखमधील सीमारेषेवर तणावाची स्थिती आहे.

भारताची सीमारेषेवर प्रत्युत्तर देण्याची तयारी-

चीनच्या कुरापतीला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदलाला सरकारने पूर्ण स्वातंत्र्य दिले आहेत. सैन्यदलाने हजारो अतिरिक्त तुकड्या सीमारेषेनजीक पाठविल्या आहेत. तर भारतीय हवाई दलाने वायू संरक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात महत्त्वाच्या तळावर तैनात केली आहे. यामध्ये लढाऊ विमानांसह हेलिकॅप्टरचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.