ETV Bharat / bharat

रणथंभोर व्याघ्र प्रकल्पातील तब्बल २६ वाघ गायब, भाजप खासदाराकडून चौकशीची मागणी - jaipur news

दीया कुमारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वाघांची संख्या घटण्याविषयी चिंता व्यक्त केली. 'या वन्यजीव अभयारण्यातील वाघांचे आणि इतर प्राण्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे,' असे त्या म्हणाल्या. त्यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात या अहवालाचा उल्लेख केला आहे. तसेच, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

रणथंभोर संरक्षित व्याघ्र प्रकल्पातील तब्बल २६ वाघ गायब

author img

By

Published : Feb 23, 2020, 9:51 PM IST

जयपूर - सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंभोर संरक्षित व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एका अहवालानुसार पार्कमधील 26 वाघ गायब असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या सदस्य आणि राजसमंद येथील भाजप खासदार दीया कुमारी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून यावर चिंता व्यक्त केली होती. या विषयावर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली आहे.

रणथंभोर संरक्षित व्याघ्र प्रकल्पातील तब्बल २६ वाघ गायब, भाजप खासदाराकडून चौकशीची मागणी

शनिवारी दीया कुमारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वाघांची संख्या घटण्याविषयी चिंता व्यक्त केली. 'या वन्यजीव अभयारण्यातील वाघांचे आणि इतर प्राण्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे,' असे त्या म्हणाल्या. त्यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात या अहवालाचा उल्लेख केला आहे. तसेच, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून शिकाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा - नमस्ते ट्रम्प : जगातील सर्वांत मोठ्या मोटेरा स्टेडियममध्ये जमणार 1.25 लाख लोक, ही आहे खासियत

दीया कुमारी यांनी आपल्या पत्रातून रणथंभोर अभयारण्याशी संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींच्या हा प्रश्न हाताळण्याच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवाय, या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही सवाल केला आहे. हा अहवाल तयार करताना केलेल्या सर्वेक्षणाला काय आधार आहे, याची माहिती घ्यावी आणि योग्य कारवाईसाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही पत्र लिहिण्यासंबंधी मुद्दा मांडला आहे. तसेच, रणथंभोरला भेट देण्यासाठी येणाऱया प्रियांका गांधी वाड्रा यांनाही याची दखल घेण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा - काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या भावाचे 'सीएए'ला समर्थन!

रणथंभोरची परिस्थिती पाहता दीया कुमारी यांनी केंद्र सरकारला एक पथक चौकशीसाठी पाठवण्याची मागणी केली आहे. तसेच, राज्य सरकारनेही निष्पक्षपातीपणे आणखी एकदा चौकशी करावी, असे म्हटले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक नियम लागू करण्याची मागणी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.