भोपाळ - मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेता दिग्विजय सिंह यांच्यावर टीकास्त्र सोडले. कमलनाथ हे सर्वांत भष्ट्र मुख्यमंत्री होतो, हे सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले. तसेच काँग्रेस सरकारच्या काळात नक्षलवादी हल्ल्यात वाढ झाली. नक्षलवाद्यांना ते रोखू शकले नाही, असेही ते म्हणाले. मात्र, आता राज्यात शिवराज सिंह यांचे सरकार असून आम्ही राज्यात कोणलाही अशांतता निर्माण करू देणार नाही, असे नरोत्तम मिश्रा म्हणाले.
तुकडे-तुकडे गॅगने आधी सीएएविरोधात आंदोलन केले. आता ते कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, त्यात ते यशस्वी होणार नाहीत. एमएसपी व्यवस्था कायम राहणार आहे, असं सरकारने म्हटलं आहे. मात्र, विरोधक कृषी कायद्यांवरून अफवा पसरवत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी कृषी आंदोलनावर दिली.
मध्य प्रदेशाचा वल्लभ भवन दलालांचा अड्डा झाला आहे, असे मी म्हटलं होतं. ते सिद्ध झाले आहे. कमलनाथ यांनी ओव्हर इटिंग केलं आहे. त्यामुळे थोडी डायटिंग तर करावीच लागेल, असेही ते म्हणाले.
३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६ हजार कोटी -
पंतप्रधान मोदींनी आज (शुक्रवार) मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात आयोजित केलेल्या शेतकरी संमेलनाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी मोदींनी नव्या कृषी कायद्यांवरही मत व्यक्त करत विरोधकांवर हल्लाबोल केला. मध्यप्रदेशातील ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६ हजार कोटी हस्तांतरीत करण्यात आल्याचेही मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा - 'नवे कृषी कायदे एका रात्रीत मंजूर झाले नाहीत'