ETV Bharat / bharat

मधल्या रांगेतील आसने रिकामी ठेवा; नागरी उड्डाण संचलनालयाचे विमान कंपन्यांना आदेश.. - नागरी उड्डाण संचलनालय आदेश

प्रवाशांच्या जास्त संख्येमुळे जर कोणा प्रवाशाला मधले आसन देण्यात आले असेल, तर त्याला स्व-सुरक्षेसाठी काही साधने पुरवण्यात यावीत असेही संचलनालयाने स्पष्ट केले आहे.

DGCA to airlines: Keep middle seats vacant to extent possible
मधल्या रांगेतील आसने रिकामी ठेवा; नागरी उड्डाण संचलनालयाचे आदेश..
author img

By

Published : Jun 1, 2020, 3:55 PM IST

नवी दिल्ली - विमान कंपन्यांनी तिकीट विक्री करताना अशा प्रकारे करावी, की जेणेकरून मधल्या रांगेतील आसने ही रिकामी राहतील. नागरी उड्डाण संचलनालयाने विमान कंपन्यांना हे आदेश दिले आहेत. विमान प्रवासात दोन प्रवाशांदरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग पाळता यावे यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, प्रवाशांच्या जास्त संख्येमुळे जर कोणा प्रवाशाला मधले आसन देण्यात आले असेल, तर त्याला स्व-सुरक्षेसाठी काही साधने पुरवण्यात यावीत असेही संचलनालयाने स्पष्ट केले आहे. यामध्ये रॅप-अराऊंड गाऊन, तीन स्तरांचे फेस शील्ड या साधनांचा समावेश आहे.

यासोबतच, नागरी उड्डाण संचलनालयाने विमान कंपन्यांना असेही आदेश दिले आहेत, की प्रवाशांना तीन स्तरीय सर्जिकल मास्क, फेस शील्ड आणि सॅनिटायझरची पाकिटे पुरवण्यात यावीत. तीन जूनपासून हे आदेश अंमलात आणले जाणार आहेत.

हेही वाचा : खुशखबर! केरळमध्ये मान्सून दाखल, सात दिवसांत महाराष्ट्रात येण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.