नवी दिल्ली - नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानाच्या कॉकपीटमध्ये घुसण्यास लोकांना मनाई केली आहे. विमान उड्डाणावेळी आता विमानातील कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणालाही परवानगी शिवाय प्रवेश करता येणार नाही. विमानाची सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे डीजीसीएने सांगितले.
हेही वाचा - "विमान आले मात्र ढग गेले"...मराठवाड्यातील कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची दैना
याबाबत डीजीसीएने नवी नियमावली लागू केली आहे. विमानातील (क्रु) कर्मचारी, उड्डाण विभागाचे कर्मचारी किंवा हवामान खात्याचे अधिकारी सोडता कोणालाही विमानाच्या कॉकपीटमध्ये बसता येणार नाही, असे डीजीसीएने म्हटले आहे. मात्र, ऑफ ड्युटी पायलाटला विमानाच्या कॉकपीटमध्ये प्रवेश करता येणार आहे.
हेही वाचा - सोलापूरकरांना मिळणार कृत्रिम पावसाचा दिलासा? ढगांच्या अभ्यासासाठी विमानाचे उड्डाण
विमानातील तात्रिंक बाबी समजून घेण्यासाठी विमान कर्मचाऱ्यांनाही कॉकपीटमध्ये येण्यास परवानगी दिली आहे. अपवादात्म पस्थितीमध्ये जर विमानामध्ये गरज पडली तर कर्मचाऱयांना आत येण्याची परवानगी देण्यात आली आहे.