नवी दिल्ली - भरपूर गाजावाजा करत पार पडलेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमानंतर भारत-अमेरिका संबंध सुधारले असल्याचे सांगितले जात होते. मात्र, भारतीयांना अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एच-१बी व्हिसांना नाकारण्याचे प्रमाण हे या कार्यक्रमानंतर अधिकच वाढले आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांचा सामान्य भारतीयांना नेमका काय फायदा होतो आहे? असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे.
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमेरिकेतील भारतीयांशी संवाद साधला होता. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थित होते. गेल्या महिनाभरात भारतीय आयटी कंपन्यांमधील, अमेरिकेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांना एच-१बी हा व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे.
-
देश में अर्थव्यवस्था की हालत एकदम पतली है। सेवा क्षेत्र औंधे मुँह गिर चुका है। रोजगार घट रहे हैं। शासन करने वाला अपने में ही मस्त है, जनता हर मोर्चे पर त्रस्त है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">देश में अर्थव्यवस्था की हालत एकदम पतली है। सेवा क्षेत्र औंधे मुँह गिर चुका है। रोजगार घट रहे हैं। शासन करने वाला अपने में ही मस्त है, जनता हर मोर्चे पर त्रस्त है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 7, 2019देश में अर्थव्यवस्था की हालत एकदम पतली है। सेवा क्षेत्र औंधे मुँह गिर चुका है। रोजगार घट रहे हैं। शासन करने वाला अपने में ही मस्त है, जनता हर मोर्चे पर त्रस्त है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 7, 2019
या मुद्द्याच्या आधारावर प्रियांका गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून नेमके कोणाचे हित साधले जात आहे हा प्रश्न सर्वांनी भाजप सरकारला विचारायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत हाऊडी मोदी हा कार्यक्रम घेतला. मात्र, मात्र, भारतीयांना अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एच-१बी व्हिसांना नाकारण्याचे प्रमाण हे वाढतच आहे. त्या पुढे म्हणाल्या, की देशाची अर्थव्यवस्था अत्यंत खराब परिस्थितीमध्ये आहे, तसेच बेरोजगारी वाढत चालली आहे. जे सत्तेत बसलेत त्यांच्यावर या सगळ्याचा परिणाम होत नाही, मात्र सामान्य माणसालाच याचा त्रास भोगावा लागत आहे.
हेही वाचा : त्रिपुरा : शरणार्थी छावणीत भुकेचे सहा बळी; केंद्र सरकारने बंद केले होते रेशन