श्रीनगर - पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी काश्मीर खोऱ्यात भारताच्या वतीने तयारी केली जात आहे. या शुद्ध थापा आहेत! हो, अशा प्रकारची कोणतीच तयारी भारताने केलेली नाही. काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या १०० तुकड्या या वेगळ्याच कारणासाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे, अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांपासून सावध राहण्याचा इशारा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिला आहे.
पाकिस्तानला धडा -
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतभर संतापाची लाट पसरलेली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत राजकीय स्तरावर प्रयत्नही करत आहे. पाकिस्तानचा विशेष देशाचा दर्जा काढून टाकण्यापासून तर सिंधू नदीचे पाणी अडवण्यापर्यंतची तयारी भारताने दर्शवली आहे. त्यातल्या त्यात अनेक देशांनी या हल्ल्याविरोधात निषेध नोंदवला आहे. यातच अफवांच्या बातम्यांना उधाण आलेले दिसते.
या आहेत अफवा -
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या वतीने काश्मीर खोऱ्यात विशेष हालचाली होत आहेत. त्यासाठी १०० पेक्षा अधिक निमलष्करी दलाच्या तुकड्या भारताने काश्मीरच्या सीमेवर तैनात केल्या आहेत. तर, सामान्य नागरिकांना एका मर्यादेतच इंधन पुरवले जाणार आहे. तसेच काही गावांना खाली करण्याचा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे, अशा बातम्या समोर येत आहे. या बातम्या खोट्या असून काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झालेली नाही. याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः राज्यपालांना पत्रकार परिषद घ्यावी लागली.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
जम्मू काश्मीरात राष्ट्रपती राजवट -
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राज्यपाल राजवट लागू झालेली होती. त्यानंतर सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान कार्यालयाला सूचित करून राष्ट्रपती राजवटीची मागणी घातली होती. काश्मीरमध्ये ६ महिन्याच्या आत निवडणूक होऊन नवे सरकार बनले नाही तर, राष्ट्रपती राजवटच सुरू राहील. त्यासाठी काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत.
अफवांना बळी पडू नये -
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना आणि दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून अतिरिक्त सुरक्षा बळ मागवून घेतले आहे, असे राज्यपालांनी म्हटले आहे. तर, अति हिमवृष्टीमुळे मागील ७ दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग बंद होता. त्यामुळे एलपीजी साठ्यात तुट निर्माण झाली आहे. ही तुट भरून निघेपर्यंत सामान्य नागरीकांना एका ठरावीक मर्यादेपर्यंतच इंधन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
असाच परिणाम औषध आणि इतर महत्वाच्या घटकांवर पडलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात औषध मागवण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील नागरीकांनी युद्धजन्य परिस्थिती सारख्या अफांना बळी पडू नये, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले आहे.