ETV Bharat / bharat

'नोटाबंदी'चा मुद्दा ट्विटरवर करतोय ट्रेंड; निवडणुकांपूर्वी जखमा ताज्या - Twitter

रविवारी भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ११ एप्रिल ते १९ मेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. यादरम्यान राजकीय पक्षच नाही तर समाज माध्यमांवरही राजकारण तापलेले दिसत आहे. ट्विटर हे सर्वात जलद गतीने अपडेट होणारे माध्यम झाले आहे.

सांकेतिक छायाचित्र
author img

By

Published : Mar 11, 2019, 8:12 PM IST

Updated : Mar 11, 2019, 8:30 PM IST

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू होण्यास ३ आठवड्यांचा कालावधी उरलेला आहे. या काळात राजकीय घडामोडींना प्रचंड गती आलेली दिसते. याचा परिणाम रस्त्यावरच नाही तर समाज माध्यमांवरही पाहण्यास मिळत आहे. ट्विटरच्या जागतिक ट्रेन्डमध्ये सोमवारी #DemonetisationYaadRakhna (नोटाबंदी आठवणीत ठेवा), हा 'हॅशटॅग' ट्रेडिंगवर दिसला.

रविवारी भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ११ एप्रिल ते १९ मे पर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. यादरम्यान राजकीय पक्षच नाही तर समाज माध्यमांवरही राजकारण तापलेले दिसत आहे. ट्विटर हे सर्वात जलद गतीने अपडेट होणारे माध्यम झाले आहे. राजकीय पक्ष या माध्यमाचा चांगलाच उपयोग करत आहेत.

काय आहे ट्रेंड ?

सध्या ट्विटवर #DemonetisationYaadRakhna हा हॅशटॅग ट्विटरवर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकार आहे. केवळ ५ तासात जगभरातून २८.८ हजार ट्विटस् या हॅशटॅग खाली करण्यात आले आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या आठवणी या निवडणूक काळात पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

twitter trend
ट्विटरवरील ट्रेंड

नोटा बंदी -

केंद्रातील मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत, असे म्हटले होते. आपण हे सर्व देशातील काळा पैसा देशातून बाद करण्यासाठी केले, असा दावा त्यावेळी त्यांनी केला होता. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. त्यावेळी देशातील जनता बँकेसमोर रांगेत लागून पैसे बदलवून घेत होते. याचा मोठा परिणाम देशांतर्गत व्यापारावरही झाला होता.

रिजर्व्ह बँकेत माहिती अधिकार -

मागच्या वर्षी रिजर्व्ह बँकेने नोटाबंदीचा ९९ टक्के पैसा परत आला आहे, असे वृत्त दिले होते. त्यानंतर देशभरातून मोदी सरकारवर टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता एका आरटीआयच्या माध्यमातून असे समोर आले आहे की, नोटा बंदीच्या दरम्यान पेट्रोल पंप, दवाखाने आणि विजेचे बिल भरताना ५०० आणि १००० किती नोटा वापरण्यात आल्या होता याचा तपशील रिजर्व्ह बँकेकडे नाही. त्यानंतर पुन्हा नोटा बंदीचा मुद्दा या निवडणूक काळामध्ये उसळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ट्रेंडिंगमध्ये कोणाचा हात -

#DemonetisationYaadRakhna हा ट्विटर ट्रेन्ड काँग्रेसच्या सर्व राज्यातील अधिकृत अकाऊंट्सच्या माध्यमातून करण्यात आल्याचे दिसत आहे. तर, काँग्रेसचे मोठे नेत्यांनीही या हॅशटॅगच्या माध्यमातून ट्विट केले आहे. तर, काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ३ तासांमध्ये १.१ हजार रिट्विट झाले आहेत.

Intro:Body:

'नोटा बंदी'चा मुद्दा ट्विटरवर करतोय ट्रेंड; निवडणुकांपूर्वी जखमा ताज्या 

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू होण्यास ३ आठवड्यांचा कालावधी उरलेला आहे. या काळात राजकीय घडामोडींना प्रचंड गती आलेली दिसते. याचा परिणाम रस्त्यावरच नाही तर समाज माध्यमांवरही पाहण्यास मिळत आहे. ट्विटरच्या जागतिक ट्रेन्डमध्ये सोमवारी #DemonetisationYaadRakhna (नोटा बंदी आठवणीत ठेवा), हा 'हॅशटॅग' ट्रेडिंगवर दिसला.  

रविवारी भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ११ एप्रिल ते १९ मेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. यादरम्यान राजकीय पक्षच नाही तर समाज माध्यमांवरही राजकारण तापलेले दिसत आहे. ट्विटर हे सर्वात जलद गतीने अपडेट होणारे माध्यम झाले आहे. राजकीय पक्ष या माध्यमाचा चांगलाच उपयोग करत आहेत.

काय आहे ट्रेंड ?

सध्या ट्विटवर #DemonetisationYaadRakhna हा हॅशटॅग ट्विटरवर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकार आहे. केवळ ५ तासात जगभरातून २८.८ हजार ट्विटस् या हॅशटॅग खाली करण्यात आले आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या आठवणी या निवडणूक काळात पुन्हा ताज्या झाल्या आहेत. 

नोटा बंदी - 

केंद्रातील मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटा बंदीची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत, असे म्हटले होते. आपण हे सर्व देशातील काळा पैसा देशातून बाद करण्यासाठी केले, असा दावा त्यावेळी त्यांनी केला होता. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. त्यावेळी देशातील जनता बँकेसमोर रांगेत लागून पैसे बदलवून घेत होते. याचा मोठा परिणाम देशांतर्गत व्यापारावरही झाला होता. 

रिजर्व्ह बँकेत माहिती अधिकार - 

मागच्या वर्षी रिजर्व्ह बँकेने नोटाबंदीचा ९९ टक्के पैसा परत आला आहे, असे वृत्त दिले होते. त्यानंतर देशभरातून मोदी सरकारवर टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता एका आरटीआयच्या माध्यमातून असे समोर आले आहे की, नोटा बंदीच्या दरम्यान पेट्रोल पंप, दवाखाने आणि विजेचे बिल भरताना ५०० आणि १००० किती नोटा वापरण्यात आल्या होता याचा तपशील रिजर्व्ह बँकेकडे नाही. त्यानंतर पुन्हा नोटा बंदीचा मुद्दा या निवडणूक काळामध्ये उसळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ट्रेंडिंगमध्ये कोणाचा हात - 

#DemonetisationYaadRakhna हा ट्विटर ट्रेन्ड काँग्रेसच्या सर्व राज्यातील अधिकृत अकाऊंट्सच्या माध्यमातून करण्यात आल्याचे दिसत आहे. तर, काँग्रेसचे मोठे नेत्यांनीही या हॅशटॅगच्या माध्यमातून ट्विट केले आहे. तर, काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ३ तासांमध्ये १.१ हजार रिट्विट झाले आहेत. 

Conclusion:
Last Updated : Mar 11, 2019, 8:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.