ETV Bharat / bharat

'उन्नाव' प्रकरणी आज होणार निकाल जाहीर, काय होणार शिक्षा याकडे सर्वांचे लक्ष - उन्नाव प्रकरण निकाल

गुरुवारी न्यायालयाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. आज दुपारी तीन वाजता तो जाहीर होणार आहे. माजी भाजप आमदार कुलदीप सेनगर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे, त्याला शिक्षा होणार की नाही याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Kuldip Singh Sengar
उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणी आज होणार निकाल जाहीर!
author img

By

Published : Dec 16, 2019, 10:50 AM IST

नवी दिल्ली - उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात आज निकाल जाहीर होणार आहे. गुरुवारी न्यायालयाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. आज दुपारी तीन वाजता तो जाहीर होणार आहे. माजी भाजप आमदार कुलदीप सेनगर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे, त्याला शिक्षा होणार की नाही याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

  • Delhi's Tis Hazari Court will pronounce the verdict at 3 pm today, on former BJP MLA Kuldeep Singh Sengar, an accused in Unnao's abduction and rape case. (file pic) pic.twitter.com/i1Lq670jcm

    — ANI (@ANI) December 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण..?

जून २०१७ मध्ये नोकरी मागण्यास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर कुलदीप सेनगर याने लैंगिक अत्याचार केला, असा आरोप तिने केला आहे. तेव्हापासून पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय न्यायासाठी लढत आहेत. त्यानंतर, सेनगर आणि त्याच्या माणसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील येत असल्याचा आरोप तरुणीने केला होता. त्यातच २८ जुलै रोजी रायबरेलीवरून माघारी येत असताना पीडितेच्या कारचा आणि ट्रकचा अपघात झाला. हा अपघात नसून कुलदीप सेनगर यांनी घातपात केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर पीडिता आणि तिचे वकील थोडक्यात बचावले होते.

या खटल्यात सीबीआयने कुलदीप सेनगर, त्यांचा ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमी अवस्थेत पीडितेला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ सप्टेंबरला तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार, पीडितेची आणि तिच्या कुटुंबाची दिल्लीमध्ये राहण्याची व्यवस्था केली गेली होती.

गुरुवार, १० डिसेंबरला दिल्ली न्यायालयाने याप्रकरणी आपला निकाल राखून ठेवला होता. आज तीस हजारी न्यायालयात हा निकाल जाहीर होणार आहे.

हेही वाचा : निर्भया बलात्कार प्रकरणाला ७ वर्ष पूर्ण, कुटुंबीय अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत

Intro:Body:

उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणी आज होणार निकाल जाहीर!

नवी दिल्ली - उन्नाव अपहरण आणि बलात्कार प्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात आज निकाल जाहीर होणार आहे. गुरुवारी न्यायालयाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. आज दुपारी तीन वाजता तो जाहीर होणार आहे. माजी भाजप आमदार कुलदीप सेनगर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे, त्याला शिक्षा होणार की नाही याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण..?

जून २०१७ रोजी नोकरी मागण्यास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर कुलदीप सेनगर याने लैंगिक अत्याचार केला, असा आरोप तिने केला आहे. तेव्हापासून पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय न्यायासाठी लढत आहेत. त्यानंतर, सेनगर आणि त्याच्या माणसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील येत असल्याचा आरोप तरुणीने केला होता. त्यातच २८ जुलै रोजी रायबरेलीवरून माघारी येत असताना पीडितेच्या कारचा आणि ट्रकचा अपघात झाला. हा अपघात नसून कुलदीप सेनगर यांनी घातपात केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर पीडिता आणि तिचे वकील थोडक्यात बचावले होते.

या खटल्यात सीबीआयने कुलदीप सेनगर, त्यांचा ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमी अवस्थेत पीडितेला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ सप्टेंबरला तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार, पीडितेची आणि तिच्या कुटुंबाची दिल्लीमध्ये राहण्याची व्यवस्था केली गेली होती.

गुरुवार, १० डिसेंबरला  दिल्ली न्यायालयाने याप्रकरणी आपला निकाल राखून ठेवला होता. आज तीस हजारी न्यायालयात हा निकाल जाहीर होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.