ETV Bharat / bharat

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण

दिल्लीेचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.. ताप, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोमवारी त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दिल्ली आरोग्य मंत्री कोरोना पॉझिटिव्ह
दिल्ली आरोग्य मंत्री कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : Jun 17, 2020, 8:52 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मंगळवारी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आज बुधवारी पुन्हा चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जैन यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोमवारी त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अचानक ताप वाढल्याने आणि शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्याने आरजीएसएसएच रुग्णालयात अॅडमिट झालो असून सर्वांना आरोग्याची माहिती देत राहील, असे ट्विट जैन यांनी केले होते.

  • Due to high grade fever and a sudden drop of my oxygen levels last night I have been admitted to RGSSH. Will keep everyone updated

    — Satyendar Jain (@SatyendarJain) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अरविंद केजरीवाल यांनी जैन यांच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. तुम्ही स्वत:ची काळजी न घेता 24 तास नागरिकांची सेवा करत असता. तुमची स्वत:चीही काळजी घेत चला आणि लवकर बरे व्हा, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. जैन यांची प्रकृती स्थिर असली तरीही त्यांना कृत्रिम श्वाच्छोश्वासावर ठेवण्यात आल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

याआधी केरजरीवाल यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. घशात दुखत असल्याने आणि ताप आल्याने त्यांची प्रकृती बरी नव्हती. मात्र, केजरीवाल यांची टेस्ट निगेटिव्ह आली. आजारी असल्याने कजरीवालांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.