ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचाराप्रकरणी १२३ गुन्हे दाखल; ६३० जणांना अटक - गुन्हे शाखा दिल्ली पोलीस

हिंसाचारामध्ये २५ जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. गुन्हे शाखेने न्यायवैद्यक शाखेच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पुरावे जमा केले. तसेच नागरिकांच्या साक्षी घेतल्या.

मनदिप सिंग रंधावा
मनदिप सिंग रंधावा
author img

By

Published : Feb 29, 2020, 9:22 AM IST

नवी दिल्ली - ईशान्य दिल्ली हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आत्तापर्यंत १२३ गुन्हे दाखल केले आहेत. तर ६३० जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) देण्यात आला आहे. दिल्ली पोलीस प्रवक्ते मनदिप सिंग रंधावा यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली.

विशेष तपास पथकाबरोबर दिल्ली क्राईम ब्रँचही तपास करत आहे. आत्तापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोनशे पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

जाळपोळीच्या २५ घटना

हिंसाचारामध्ये २५ जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. गुन्हे शाखेने न्यायवैद्यक शाखेच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पुरावे जमा केले. तसेच नागरिकांच्या साक्षी नोंदवल्या. या प्रकरणी आपचे नगरसेवक ताहिर हुसेन यांना आरोपी बनवण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.

बालकांना हिंसाचारामुळे बसला धक्का

हिंसाचाराच्या अनेक बालकांना मानसिक धक्का बसला आहे. दिल्ली बाल संरक्षण आयोगाने प्रशासनाकडे अशा बालकांचा आकडा मागितला आहे. त्यांना मदत केली जाणार आहे. तसचे आयोगाने फुटपाथवर राहणाऱ्या मुलांचीही माहिती मागितली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.