ETV Bharat / bharat

Delhi Violence : सोनिया, राहुल यांनी केलं शांततेचं आवाहन

सोनिया यांनी आपल्या ट्विटमध्ये नागरिकांनो शांतता बाळगा आणि देशात जातीयतेच्या नावाखाली फूट पाडणाऱ्या धर्मांध शक्तींचे मनसूबे उधळून लावा, असं म्हटलं आहे.

delhi violence : no place in country for communal ideology says sonia gandhi on delhi clashes
Delhi Violence : सोनिया, राहुल यांनी केलं शांततेचं आवाहन
author img

By

Published : Feb 25, 2020, 2:40 AM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला सोमवारी दिल्लीत हिंसक वळण लागले. या हिंसक आंदोलनात दिल्ली पोलीस दलातील एक हेडकॉन्स्टेबसह चार जण ठार झाले. या हिंसाचारावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ट्विट करत नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

सोनिया यांनी आपल्या ट्विटमध्ये नागरिकांनो शांतता बाळगा आणि देशात जातीयतेच्या नावाखाली फूट पाडणाऱ्या धर्मांध शक्तींचे मनसूबे उधळून लावा, असं म्हटलं आहे.

  • Congress President Sonia Gandhi: I appeal to the people of Delhi to maintain communal harmony and defeat the ill intentions of forces trying to divide India on the basis of religion. pic.twitter.com/uYTEqTJs5W

    — ANI (@ANI) February 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोनिया यांच्यासह राहुल गांधी यांनी देखील याविषयी ट्विट केले असून त्यात त्यांनी दिल्लीत जी हिंसा झाली. ते निषेधार्ह आहे. शांततेच्या मार्गाने केलेला विरोध हे लोकशाहीचे प्रतिक ठरते. हिंसेचा मार्ग कधीच चांगला असू शकत नाही. मी दिल्लीवाशियांना आवाहन करतो की, त्यांनी धर्मांध शक्तीच्या मागे जाऊ नये. संयम, करुणा आणि सामंज्यसपणा दाखवावा. असे म्हटले आहे.

  • The violence today in Delhi is disturbing & must be unequivocally condemned. Peaceful protests are a sign of a healthy democracy, but violence can never be justified. I urge the citizens of Delhi to show restraint, compassion & understanding no matter what the provocation.

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. शाह यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून तातडीची बैठक घेतली. या बैठकीला शाह यांच्यासह गृहसचिव ए. के. भल्ला, गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, नायब राज्यपाल अनिल बैजल आणि दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक हेही उपस्थित असल्याचं समजते.

दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष दिल्लीत आहेत. यामुळे योग्य ती खबरदारी घेण्यासाठी अमित शाह यांनी स्वतः सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत.

हेही वाचा -

नमस्ते ट्रम्प : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा पहिला दिवस पहा फोटोंमधून..

हेही वाचा -

दिल्ली हिंसाचार : अमित शाह यांनी सूत्रं हाती घेतली, तातडीने बैठक बोलावून घेतला आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.