ETV Bharat / bharat

दिल्लीतील जनजीवन पूर्व पदावर, परिस्थिती नियंत्रणात - अमित शाह यांचे दिल्लीकरांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आव्हान

पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हिंसाचारग्रस्त परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. यामुळे काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आली. आतापर्यंत हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ४८ एफआयआर दाखल केल्या आहेत. तसेच पोलिसांनी ५१४ जणांना ताब्यात घेतले आहे. चौकशी नंतर त्यांना अटकही होऊ शकते.

Delhi returning to normal : amit shah has appealed to citizens to not believe in rumours
दिल्लीतील जनजीवन पूर्व पदावर, परिस्थिती नियंत्रणात
author img

By

Published : Feb 28, 2020, 3:46 AM IST

Updated : Feb 28, 2020, 3:52 AM IST

नवी दिल्ली - हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीत जनजीवन पूर्व पदावर येत आहे. मागील ३६ तासांत कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही. यामुळे शुक्रवारी सकाळी १० वाजेनंतर जमावबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार असल्याचे गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने ईशान्य दिल्लीतील परिस्थिती हाताळण्यासाठी जमावबंदी केली. तसेच दंगेखोरांना पाहताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हिंसाचारग्रस्त परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. यामुळे काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आली. आतापर्यंत हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ४८ एफआयआर दाखल केल्या आहेत. तसेच पोलिसांनी ५१४ जणांना ताब्यात घेतले आहे. चौकशी नंतर त्यांना अटकही होऊ शकते.

  • MHA: So far, 48 FIRs, pertaining to clashes, loss of lives/property, etc have already been registered & further FIRs would be registered in due course. Police has detained/arrested 514 suspects for questioning so far. Further arrests would be effected in course of investigation. https://t.co/eDJ50bdcyc

    — ANI (@ANI) February 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी रात्री गृह सचिव अजय भल्ला, पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक आणि विशेष पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर गृहमंत्रालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यात सुरक्षेसंबंधी उपाय योजनांसह नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.

बैठकीनंतर अमित शाह यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. काही समाजकंटक सामाजिक सौहार्द बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत, असे आवाहन केले आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. 22829334 आणि 22829335 या क्रमांकावर फोन करून हिंसा करणाऱ्यांची माहिती नागरिक देऊ शकतात, असे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा -

नागरिकत्व कायद्यासंदर्भातील आंदोलने आणि काँग्रेस..

हेही वाचा -

दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा ३८ वर, तर २०० पेक्षा जास्त जण जखमी

Last Updated : Feb 28, 2020, 3:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.