ETV Bharat / bharat

दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २१ जानेवरी ही शेवटची तारीख आहे. काँग्रेस केंद्रीय निवडणूक समिती आज उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. भाजप उर्वरीत १३ जागांची यादी उद्या जाहीर करणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक
दिल्ली विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Jan 18, 2020, 8:28 AM IST

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची भाजप, आप पक्षाची लगबग सुरू आहे. आम आदमी पक्षाने सर्वच्या सर्व म्हणजे ७० जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेस पक्ष आज उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. भाजपनेही ५७ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २१ जानेवरी ही शेवटची तारीख आहे. भाजप उर्वरीत १३ जागांची यादी उद्या जाहीर करणार आहे. काँग्रेस केंद्रीय निवडणूक समिती आज उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. अनेक उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी होण्याची शक्यता असल्याचे दिल्ली काँग्रेस प्रमूख सुभाष चोप्रा यांनी सांगितले.

नागरिकत्व सुधारण कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरून राजधानी दिल्लीमध्ये मागील एक महिन्यांपासून आंदोलने होत आहेत, जेएनयू, जामिया मिलीया विद्यापीठ, शाहिनबाग, सीलमपूर येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यावेळी झालेल्या धरपकडीमुळे दिल्लीतील जनता पोलिसांवर नाराज आहे. त्याचाही निवडणुकीत प्रभाव पडण्याची शक्यता आहे. नुकत्याच देशभरामध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नागरिक कोणाच्या हातात दिल्लीची सत्ता सोपवतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

नामांकन अर्ज भरण्यासाठी फक्त ३ दिवस शिल्लक राहीले आहेत. आप नेते आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी काल(शुक्रवारी) उमेदवारी अर्ज भरला. दिल्ली सरकारने शिक्षणावर सर्वात जास्त खर्च केला असून विरोधकांनी या मुद्द्यावर निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान त्यांनी काँग्रेस आणि भाजपला केले आहे. इतर राज्ये शिक्षणावरील खर्च कमी करत आहेत, तर त्याच वेळी दिल्ली सरकराने शिक्षणावर खर्च वाढवल्याचे ते म्हणाले.

Intro:Body:

दिल्ली विधानसभा निवडणूक: काँग्रेस आज जाहीर करणार उमेदवार, २१ जानेवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची भाजप, आप पक्षाची लगबग सुरू आहे. आम आदमी पक्षाने सर्वच्या सर्व म्हणजे ७० जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेस पक्ष आज उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. भाजपनेही ५७ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २१ जानेवरी ही शेवटची तारीख आहे. भाजप उर्वरीत १३ जागांची यादी भाजप उद्या जाहीर करणार आहे. काँग्रेस केंद्रीय निवडणूक समिती आज उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. अनेक उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून राष्ट्रीय जनता दल पक्षासोबत आघाडी होण्याची शक्यता असल्याचे दिल्ली काँग्रेस प्रमूख सुभाष चोप्रा यांनी सांगितले.

नागरिकत्व सुधारण कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी वरून राजधानी दिल्लीमध्ये मागील एक महिन्यांपासून आंदोलने होत आहेत, जेएनयू, जामिया मिलीया विद्यापीठ, शाहिनबाग, सीलमपूर येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यावेळी झालेल्या धरपकडीमुळे दिल्लीतील जनता पोलिसांवर नाराज आहे. त्याचाही निवडणुकीत प्रभाव पडण्याची शक्यता आहे. नुकत्याच देशभरामध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नागरिक कोणाच्या हातात दिल्लीची सत्ता सोपवतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

नामांकन अर्ज भरण्यासाठी फक्त ३ दिवस शिल्लक राहीले आहेत. आप नेते आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी काल(शुक्रवारी) उमेदवारी अर्ज भरला. दिल्ली सरकारने शिक्षणावर सर्वात जास्त खर्च केला असून विरोधकांनी या मुद्द्यावर निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान त्यांनी काँग्रेस आणि भाजपला केले आहे. इतर राज्ये शिक्षणावरील खर्च कमी करत आहेत, तर त्याच वेळी दिल्ली सरकराने शिक्षणावर खर्च वाढवल्याचे ते म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.