नवी दिल्ली - शहरात लॉकडाऊन असतानाही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. दिल्लीत दररोज चोरी आणि दरोडेखोरीच्या समोर येत आहेत. आजही दिल्लीतील मजनू का तिल्ला या भागात एका व्यक्तीला मारहाण करून लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ओंकार सिंह पुराना चंद्रावल, असे अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हा नोंदवून संपूर्ण कार्यवाही करण्यात आली. पोलिसांनी गुन्हेगारांकडून चोरीचा माल जप्त केला आहे.