नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारामध्ये 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 712 गुन्हे दाखल केले असून 200 पेक्षा अधिक ओरोपींना अटक केली आहे. शहरातील परिस्थिती सामान्य असल्याचे दिल्ली पोलीस प्रवक्ते एम. एस. रंधावा यांनी सांगितले.
पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये दिल्ली हिंसाचारावरील तक्रारी नोंदवण्यासाठी विशेष डेस्क तयार करण्यात आला आहे. माध्यमे आणि लोकांच्या मदतीने अनेक व्हिडिओ मिळाले असून आरोपींची ओळख पटवण्यास या व्हिडिओंची मदत होत आहे, अशी माहिती रंधावा यांनी दिली.
24 फेब्रुवारीला सीएए समर्थक आणि आणि विरोधकांमध्ये झालेल्या दंगलीने लवकरच भीषण स्वरूप धारण केले होते. यानंतर तीन दिवस ईशान्य दिल्लीमध्ये हिंसाचार सुरू होता. या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दोन विशेष पथके तैनात केली आहेत.
हेही वाचा - थैलायवाची राजकारणात दमदार एंट्री; केली पक्षाची घोषणा