नवी दिल्ली - रविवारी सकाळी दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये हवामान पूर्णपणे बदलले असून आज सकाळ पासूनच गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, पलवल आणि बल्लभगडसह दिल्लीतील काही भागात रिमझीम पाऊस सुरु आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह उत्तर भारतातील अनेक भागात 3 ते 6 मे दरम्यान हलका ते मध्यम पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, उत्तर भारतीय मैदानी भाग आणि डोंगरी भागात रविवारपासून हलका ते मध्यम पाऊस सुरू होईल. पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडेल. काही भागांत गारपीट देखील होऊ शकते.