नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत केजरीवाल सरकार यांचे कोरोना महामारीचे व्यवस्थापन काहीसे ढासळलेले दिसत आहे. दिल्लीत लॉकडाऊन दरम्यान काही लोकांची राहण्याची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव अशा नागरिकांना फुटपाथवर राहण्यास भाग पडत आहे. एम्स रुगणालयाच्या परिसरात आजही हजारो लोक फुटपाथवरच राहत असल्याचे आढळून आले आहे.
हेही वाचा... कोरोनाशी कर सुरु लढाई..! जनजागृतीसाठी 'ईटीव्ही भारत'चे खास मराठी गीत
कोरोनाच्या संकटकाळात लोकांच्या समस्येत अधिक वाढ
दिल्ली सरकारकडून सातत्याने हा दावा केला जात आहे की, जे लोक दिल्लीत आहेत, त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था दिल्ली सरकार करेल. मात्र, दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या परिसरात आजही काही मजूर लोक असे आहेत, ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही, तसेच खाण्यासाठी अन्न नाही. त्यामुळे नाईलाजास्तव हे लोक फुटपाथवर राहत आहेत.