नवी दिल्ली - पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेस नेते शशी शरूर यांना न्यायालयाने परदेशात जाण्याची परवानगी नाकारली होती. मात्र, दिल्ली न्यायालयाने त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहाड यांनी थरुर यांना १४ ते १८ नोव्हेंबरला दुबईला एका कार्यक्रमात जाण्याची परवानगी दिली आहे.
न्यायालयाने शरुर यांना २ लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. परदेशवारीवरुन परत आल्यानंतर त्यांना ती अनामत रक्कम परत मिळणार आहे. मात्र, या काळात शशी थरुर यांना सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातील कोणत्याही साक्षीदाराला भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच साक्षीदारांना धमकावण्यापासून रोखण्यात आले आहे. बाहेर देशात जाण्यास मिळालेल्या परवानगीचा थरूर गैरफायदा घेऊ नका, असे न्यायालयाने त्यांना सांगितले.
परदेशवारीचा सविस्तर वृत्तांत शशी थरुर यांना न्यायालयात जमा करण्यात सांगण्यात आले आहे. या सर्व अटींवर त्यांना परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी शरुर यांच्या परदेश दौऱ्याला परवानगी देण्यास विरोध केला होता. खटला सुरु असताना थरुर बाहेर देशात गेले तर ते तिकडेच आश्रय घेण्याची शक्यता आहे.
याबरोबरच थरुर यांनी अमेरिका, मेक्सिको आणि ओमानला जाण्याची परवानगी मागितली आहे. यावर नंतर विचार करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील एका आलिशान हॉटेलात जानेवारी २०१४ मध्ये मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी माजी केंद्रिय मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र, त्यांना अटक करण्यात आली नाही.
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: शशी थरुर यांना परदेशात जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण
पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेस नेते शशी थरूर यांना न्यायालयाने परदेशात जाण्याची परवानगी नाकारली होती. मात्र, दिल्ली न्यायालयाने त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.
नवी दिल्ली - पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेस नेते शशी शरूर यांना न्यायालयाने परदेशात जाण्याची परवानगी नाकारली होती. मात्र, दिल्ली न्यायालयाने त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहाड यांनी थरुर यांना १४ ते १८ नोव्हेंबरला दुबईला एका कार्यक्रमात जाण्याची परवानगी दिली आहे.
न्यायालयाने शरुर यांना २ लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. परदेशवारीवरुन परत आल्यानंतर त्यांना ती अनामत रक्कम परत मिळणार आहे. मात्र, या काळात शशी थरुर यांना सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातील कोणत्याही साक्षीदाराला भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच साक्षीदारांना धमकावण्यापासून रोखण्यात आले आहे. बाहेर देशात जाण्यास मिळालेल्या परवानगीचा थरूर गैरफायदा घेऊ नका, असे न्यायालयाने त्यांना सांगितले.
परदेशवारीचा सविस्तर वृत्तांत शशी थरुर यांना न्यायालयात जमा करण्यात सांगण्यात आले आहे. या सर्व अटींवर त्यांना परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी शरुर यांच्या परदेश दौऱ्याला परवानगी देण्यास विरोध केला होता. खटला सुरु असताना थरुर बाहेर देशात गेले तर ते तिकडेच आश्रय घेण्याची शक्यता आहे.
याबरोबरच थरुर यांनी अमेरिका, मेक्सिको आणि ओमानला जाण्याची परवानगी मागितली आहे. यावर नंतर विचार करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील एका आलिशान हॉटेलात जानेवारी २०१४ मध्ये मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी माजी केंद्रिय मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र, त्यांना अटक करण्यात आली नाही.
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: शशी थरुर यांना परदेशात जाण्याची परवानगी मिळाली
नवी दिल्ली - पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेस नेते शशी शरूर यांना न्यायालयाने परदेशात जाण्याची परवानगी नाकारली होती. मात्र, दिल्ली न्यायालयाने त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. विषेश न्यायाधीश अजय कुमार कुहाड यांनी थरुर यांना १४ ते १८ नोव्हेंबरला दुबईला एका कार्यक्रमात जाण्याची परवानगी दिली आहे.
न्यायालयाने शरुर यांना २ लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. परदेशवारीवरुन परत आल्यानंतर त्यांना ती अनामत रक्कम परत मिळणार आहे. मात्र, या काळात शशी थरुर यांना सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातील कोणत्याही साक्षीदाराला भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच साक्षीदारांना धमकावण्यापासून रोखण्यात आले आहे. बाहेर देशात जाण्यास मिळालेल्या परवानगीचा थरूर गैरफायदा घेऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने त्यांना सांगितले.