ETV Bharat / bharat

दिल्ली विधानसभा निवडणूक; 57.06 टक्के मतदान - Delhi Assembly Elections news

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये 57.06 टक्के मतदान झाले.

delhi assembly polls
दिल्ली विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Feb 8, 2020, 7:41 AM IST

Updated : Feb 9, 2020, 4:57 AM IST

LIVE:

  • दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सांयकाळी 6 वाजेपर्यंत 57.06 टक्के मतदान झाले आहे.
  • सांयकाळी 5 वाजेपर्यंत 44.52 टक्के मतदान
  • दुपारी 4 वाजेपर्यंत 42.70 टक्के मतदान
  • दुपारी 3 वाजेपर्यंत ३० टक्के मतदान
    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदान केले
  • दुपारी १२ वाजेपर्यंत १६ टक्के मतदान
  • बाबरपूरा मतदारसंघातील एमडीसी बूथवर निवडणूक अधिकाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू
    मतदानासाठी राष्ट्रपती, माजी पंतप्रधानांसह अनेक नेते दाखल
  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सहपत्नीक निर्माण भवन येथील बूथवर मतदानाचा हक्क बजावला.
  • प्रत्येकाने मतदान करायला हवे. आळसात राहू नका, मतदान खुप महत्त्वाचे आहे - प्रियंका गांधी
  • ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी औरंगजेब लेन येथे मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत कन्या प्रतिभा अडवाणी होत्या.
  • औरंगजेब लेन येथील मतदान केंद्रावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
  • काँग्रेसच्या अंतरीम अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी निर्माण भवन येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • काँग्रेस आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मंजू का टिला येथे धरपकड. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी आपच्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे आप नेते संजय सिंह यांनी सांगितले आहे.
  • दिल्ली विधानसभा निवडणुकीत सकाळी ११ वाजेपर्यंत ६.९६ टक्के मतदान

  • दिल्ली विधानसभेसाठी सकाळी दहा वाजेपर्यंत ४. ३३ टक्के मतदान
  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहकुटुंब सिव्हिल लाईन येथील बूथवर मतदान करण्यासाठी आले आहेत. केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे सुनिल यादव आणि काँग्रेसचे रोमेश सभरवाल या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
  • दिल्ली विधानसभा निवडणुकीत सकाळी ९ पर्यंत २.८ टक्के मतदान
  • यमुना विहार येथील सी ब्लॉक येथे मतदान केंद्रावर तात्रिंक अडचणीमुळे मतदान सुरू झाले नाही. निवडणूक आयोगाचे तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल
  • सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. भानुमती तुघलक क्रेसेन्ट येथील केंद्रावर मतदान करण्यासाठी आल्या आहेत.
  • केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन कुटुंबीयांसह कृष्णा नगरमधील रतन पब्लिक स्कूल येथे मतदान करण्यासाठी आले आहेत.
  • दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल सहपत्नीक ग्रेटर कैलाश येथील मतदान केंद्रावर दाखल
  • दिल्ली विधानसभेच्या मतदानाला सुरुवात
  • नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी आज(शनिवारी) मतदान होत आहे. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुमारे 1 कोटी 47 लाखांहून अधिक नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
  • मतदानासाठी 13 हजार 750 मतदान केंद्र आणि 90,000 मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक निवडणूक आयोगाने केली आहे. यावेळी पहिल्यांदाच अपंग आणि 80 वर्षांवरील वृद्ध नागरिकांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाने मतदान सुरक्षितपणे पार पडावे, यासाठी सीआरपीएफच्या १९० तुकड्या आणि गृहरक्षक दलाचे १९ हजार जवान तैनात केले आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू असलेल्या शाहीन बागेत देखील ५ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. दिल्ली विधानसभेच्या 2015 साली झालेल्या निवडणुकांत आम आदमी पक्षाने ६७ जागा जिंकत घवघवीत यश मिळवले होत. तर भाजपला फक्त तीन जागा जिंकता आल्या होत्या. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातपैकी पाच मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत विजयाची आशा आहे. मात्र, मुख्य संघर्ष भाजप आणि आप या पक्षांमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
  • मागच्या पाच वर्षांसाठी दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाच्या हाती सत्ता दिली होती. आरोग्य, शिक्षण, वीज आणि मुलभूत सुविधा सुधारल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. तर भाजपनेही दिल्लीकरांसाठी भरीव काम केल्याचा दावा केला आहे. या निवडणुकीत दिल्लीकर कोणाच्या पारड्यात बहुमत टाकतात, हे लवकरच समजेल.

Intro:Body:

LIVE : दिल्ली विधानसभेच्या मतदानाला सकाळी आठ वाजता होणार सुरुवात

नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी आज(शनिवारी) मतदान होत आहे. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे.

मतदानासाठी पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुमारे 1 कोटी 47 लाखांहून अधिक नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 मतदानासाठी 13 हजार 750 मतदान केंद्र आणि 90,000 मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक निवडणूक आयोगाने केली आहे. यावेळी पहिल्यांदाच अपंग आणि 80 वर्षांवरील वृद्ध नागरिकांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाने मतदान सुरक्षीत पार पडावे, यासाठी सीआरपीएफच्या १९० तुकड्या आणि गृहरक्षक दलाचे १९ हजार जवान तैनात केले आहेत.

सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू असलेल्या शाहीन बागेत देखील ५ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

 दिल्ली विधानसभेच्या 2015 साली झालेल्या निवडणुकांत आम आदमी पक्षाने ६७ जागा जिंकत घवघवीत यश मिळवले होत. तर भाजपला फक्त तीन जागा जिंकता आल्या होत्या. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सात पैकी पाच मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत विजयाची आशा आहे. मात्र, मुख्य संघर्ष भाजप आणि आप या पक्षांमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

मागील पंचवार्षीकमध्ये दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाच्या हाती सत्ता दिली होती. आरोग्य, शिक्षण, वीज आणि मुलभूत सुविधा सुधारल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. तर भाजपनेही दिल्लीकरांसाठी भरीव काम केल्याचा दावा केला आहे. या निवडणुकीत दिल्लीकर कोणाच्या पारड्यात बहुमत टाकतात, हे लवकरच समजेल.

Conclusion:
Last Updated : Feb 9, 2020, 4:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.