नवी दिल्ली - शेतकरी नेता व्ही. एम. सिंग आणि भानु गटाने (भारतीय किसान यूनियन) आंदोलन संपवल्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी राकेश टिकैत आणि इतर शेतकरी नेत्यांवर आरोप केले आहेत. आंदोलनकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी, असेही ते म्हणाले. ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचाराला केंद्र सरकारही जबाबादार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱ्यासाठी लाखो रुपयाच्या बक्षिसाची घोषणा झाली होती. तेव्हा सरकार काय करत होते. भारतीय ध्वजाचा कोणी अपमान करत असेल. तर तसे करणारे चुकीचे आहेत. ज्यांनी यास पाठिंबा दर्शवला तेही चुकीचे आहेत. आयटीओमधील एक सहकारीही शहीद झाला. ज्यांनी शेतकऱ्यांना भडकवण्याच काम केलं. त्या सर्वांवर कारवाई केली जावी, असे ते म्हणाले.
आम्ही एमएसपीसाठी आलो होते. हिंसा करण्यासाठी नाही. ज्या लोकांनी ट्रॅक्टर रॅलीच्या नियोजीत मार्गांचे उल्लघंन केले. त्यांच्यावर कारवाई करावी, असेही व्ही.पी.सिंग म्हणाले.
भारतीय शेतकरी संघाच्या भानु गटाने शेतकरी आंदोलनातून माघार घेतली आहे. दिल्लीत हिंसा पसरवणाऱ्या आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणी संघटनेचे प्रमुख भानू प्रताप सिंग यांनी केली.
काय प्रकरण?
प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले. प्रजासत्ताक दिनी लालकिल्ल्यात घुसून शेतकऱ्यांच्या काही गटाने आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर चढाई करून किल्ल्याच्या घुमटावर निशाण ए साहिब ध्वज फडकावला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती. आंदोलक मागे हटत नसल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे. या हिंसाचारात दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 22 एफआयआर नोंदविल्या आहेत. दिल्लीत अजूनही अनेक मार्ग बंद आहेत. तथापि, शेतकरी संघटना आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील.