ETV Bharat / bharat

राम मंदिर भूमीपूजन उत्सवासाठी अयोध्येतील मंदिरात 'दीपोत्सव'

author img

By

Published : Jul 31, 2020, 5:58 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांनी 'भूमिपूजना'च्या एक दिवस आधीपासून 'दीपोत्सव' आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 आणि 5 ऑगस्टला अयोध्येतील सर्व मंदिरे आणि मठ दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघतील.

राम मंदिर भूमीपूजन
राम मंदिर भूमीपूजन

अयोध्या (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील ‘राम मंदिर भूमीपूजन उत्सव’ साजरा करण्यासाठी 'दीपोत्सव' आयोजित केला आहे. राज्यातील सर्व मंदिरांना दिवाळीप्रमाणे रोषणाई करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व मंदिरांमध्ये दिव्यांची आरास करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आदित्यनाथ यांनी 25 जुलैला अयोध्येतील रामजन्मभूमी स्थानाला भेट दिली होती. त्यावेळी, त्यांच्या हस्ते रामजन्मभूमी मंदिरात लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती नव्या आसनांवर ठेवण्यात आल्या.

राम मंदिरासाठी कोरलेल्या दगडांची पाहणी केल्यानंतर योगींनी विश्व हिंदू परिषदेच्या मुख्यालयात कारसेवक पुरम येथे पुरोहित आणि राम मंदिर ट्रस्टच्या सदस्यांची बैठक घेतली. ‘अखेर रामजन्मभूमीवर राम मंदिर स्थापनेचा हा शुभ मुहूर्त 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आला आहे. म्हणूनच, हा प्रसंग दिवाळीप्रमाणे साजरा केला पाहिजे,’ असे आदित्यनाथ यांनी सर्व पुरोहितांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांनी 'भूमिपूजना'च्या एक दिवस आधीपासून 'दीपोत्सव' आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 आणि 5 ऑगस्टला अयोध्येतील सर्व मंदिरे आणि मठ दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघतील.

3 ऑगस्टला धार्मिक विधी

राम मंदिरासाठी 'भूमिपूजना'च्या दोन दिवसाआधी 3 ऑगस्टपासून धार्मिक विधी सुरू होतील. त्याशिवाय शहरात रामायणाचे पठणही होणार आहे.

सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

रामजन्मभूमीच्या भूमिपूजनानिमित्त महामार्गावरील ओव्हरब्रिजचे खांब कलाकृतींनी सजविले जात आहेत. तसेच सर्व मंदिरांमधील प्रवेशद्वारे सुशोभित करण्यात आली आहेत. अयोध्या आणि फैजाबाद या जुळ्या पवित्र शहरांतील सर्व रस्त्यांना एक भव्य स्वरूप दिले जात आहे. सर्व मुख्य ठिकाणी विविध स्वागत कमानी तयार केल्या जात आहेत.

भूमीपूजनाला भव्य उत्सवाचे स्वरूप

श्रीमनी रामदास छावणी यांचे वारस आणि श्री रामजन्मभूमीचे ज्येष्ठ सदस्य न्यास कमलनयन दास म्हणाले की, भव्य भूमिपूजनाची तयारी चालू आहे. अयोध्येत तीन दिवसांचे मोठा उत्सव होईल.

राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे पसरलेली महामारी पाहता लोकांना त्यांच्या घरी हा कार्यक्रम साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूमीपूजनाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी ट्रस्ट सर्व शक्य प्रयत्न करीत आहे, यासाठी अयोध्याच्या सर्व मुख्य ठिकाणी एलईडी स्क्रीन बसविली जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी करतील. मंदिर उभारणीचा कार्यक्रम शिलान्यास सोहळ्याने सुरू होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.