ETV Bharat / bharat

केरळमधील पेट्टीमुडी भूस्खलनातील मृतांचा आकडा ५२वर, पाचव्या दिवशीही बचावकार्य सुरूच - पेट्टीमुडी भूस्खलन अपडेट

राजमलाजवळील पेट्टीमुडी येथे झालेल्या भूस्खलनामुळे जमीनदोस्त झालेल्या घरांच्या ढिगार्‍यातून पाच दिवसांनंतरही मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. आता यासाठी श्वानांची मदत घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या भागात 78 लोक राहत होते, असे सरकारने सांगितले आहे. यापैकी 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, ५२ मृतदेह सापडले आहेत.

pettimudi landslide disaster kerala  pettimudi landslide disaster update  पेट्टीमुडी भूस्खलन मृत्यू  पेट्टीमुडी भूस्खलन अपडेट  पेट्टीमुडी भूस्खलन केरळ
केरळमधील पेट्टीमुडी भूस्खलन
author img

By

Published : Aug 11, 2020, 1:09 PM IST

कोची - केरळमधील इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे चहा-मळे कामगारांची घरे जमीनदोस्त झाली आहे. या घटनेत मृतांचा आकडा ५२ वर पोहोचला आहे. येथील ढिगार्‍यातून पाचव्या दिवशीही मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच आतापर्यंत १२ जणांना वाचविण्यात यश आले आहे. तसेच अद्यापही काहीजण बेपत्ता आहेत.

राजमलाजवळील पेट्टीमुडी येथे झालेल्या भूस्खलनामुळे जमीनदोस्त झालेल्या घरांच्या ढिगार्‍यातून पाच दिवसांनंतरही मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. आता यासाठी श्वानांची मदत घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या भागात 78 लोक राहत होते, असे सरकारने सांगितले आहे. यापैकी 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, ५२ मृतदेह सापडले आहेत. उरलेल्यांनाही शोधण्याचे प्रयत्न अथकपणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडली. केरळातील एनडीआरएफ प्रमुख रेखा नंबियार या घटनेतील उर्वरित लोकांना वाचवण्यासाठी 55 सहकार्‍यांसह शोध आणि बचाव मोहीम राबवत आहेत. तसे काहीजण जवळच असलेल्या नदीमध्ये वाहत गेल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मदत शिबिरातही वेगवेगळे भाग करून तेथे लोकांना ठेवले आहे. एर्नाकुलम जिल्ह्यात 1 हजार 203 पूरग्रस्तांना मदत शिबिरात हलवण्यात आले आहे. सर्वसाधारण मदत शिबिरात 1 हजार 118 लोकांना ठेवण्यात आले आहे, तर 67 ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षांवरील लोकांसाठी असलेल्या शिबिरात ठेवले आहे. बाहेरगावाहून आलेल्या 18 लोकांना विलगीकरण कक्ष तयार करून तेथे ठेवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.