ETV Bharat / bharat

कोरोना संशयित मृत व्यक्तीचा अहवाल आला 'पॉझिटिव्ह'; मध्यप्रदेशातील बळींची संख्या ६ वर..

ही व्यक्ती खारगोणे जिल्ह्यातील घारगाव येथे राहणारी होती. इंदूरच्या एम. वाय. रुग्णालयात रविवारी त्यांचा मृत्यू झाला. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा संशय असल्यामुळे त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर आज या व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.

Dead man's sample found coronavirus positive; MP toll reaches 6
कोरोना संशयित मृतकाचा अहवाल आला 'पॉझिटिव्ह'; मध्यप्रदेशातील बळींची संख्या ६ वर..
author img

By

Published : Apr 1, 2020, 4:01 PM IST

भोपाळ - तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या एक ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या बळींची एकूण संख्या सहावर पोहोचली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

ही व्यक्ती खारगोणे जिल्ह्यातील घारगाव गावात राहणारी होती. इंदूरच्या एम. वाय. रुग्णालयात रविवारी त्यांचा मृत्यू झाला. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा संशय असल्यामुळे त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर आज या व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती खारगोणेचे जिल्हाधिकारी गोपालचंद्र दाड यांनी दिली.

या रुग्णाला सुरुवातीला खारगोणेच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची तब्येत खालावत चालल्याने त्यांना राज्य सरकारमार्फत चालवल्या जाणाऱ्या एमवाय रुग्णालयात हलवण्यात आले, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : #COVID१९ : गरीब अन् मजुरांना मिळणार मोफत अन्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.