नवी दिल्ली - हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणानंतर देशातील बलात्कार प्रकरणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बलात्कार प्रकरणातील आरोपींना सहा महिन्यांत फासावर लटकावले पाहिजे, या मागणीसाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल मंगळवारपासून अमरण उपोषण करणार आहेत.
-
बहुत हो गया! नन्ही 6 साल की बेटी & प्रियंका रेडी की चीख़ें मुझे 2 मिनट बैठने नही दे रही।
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) December 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
रेपिस्ट को हर हाल में 6 महीने में फाँसी हो -इस क़ानून को लागू करवाने के लिए मैं कल से जंतर मंतर पे आमरण अनशन पे बैठ रही हूँ।
तब तक अनशन करूँगी जब तक महिलायों को सुरक्षा की गैरंटी न मिलती!
">बहुत हो गया! नन्ही 6 साल की बेटी & प्रियंका रेडी की चीख़ें मुझे 2 मिनट बैठने नही दे रही।
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) December 2, 2019
रेपिस्ट को हर हाल में 6 महीने में फाँसी हो -इस क़ानून को लागू करवाने के लिए मैं कल से जंतर मंतर पे आमरण अनशन पे बैठ रही हूँ।
तब तक अनशन करूँगी जब तक महिलायों को सुरक्षा की गैरंटी न मिलती!बहुत हो गया! नन्ही 6 साल की बेटी & प्रियंका रेडी की चीख़ें मुझे 2 मिनट बैठने नही दे रही।
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) December 2, 2019
रेपिस्ट को हर हाल में 6 महीने में फाँसी हो -इस क़ानून को लागू करवाने के लिए मैं कल से जंतर मंतर पे आमरण अनशन पे बैठ रही हूँ।
तब तक अनशन करूँगी जब तक महिलायों को सुरक्षा की गैरंटी न मिलती!
हैदराबाद बलात्कार पीडितेची आर्त हाक मला 2 मिनिटेही शांत बसू देत नाही. बलात्कार प्रकरणातील आरोपींना सहा महिन्यांत फासावर लटकावले पाहिजे. जोपर्यंत हा कायदा लागू होत नाही. तोपर्यंत मी जंतर-मंतर येथे अमरण उपोषणाला बसणार आहे, असे स्वाती मालीवाल यांनी टि्वट करून म्हटले आहे.
दिल्लीतील निर्भयावरील बलात्कार व तिची अमानुष हत्या आठवून देणाऱ्या घटना एकापाठोपाठ घडत आहेत. त्यामुळे देशभराममध्ये खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून टाकण्यात आले. त्यानंतर दोन दिवसातच दुसऱ्या एका महिलेलाही जाळून टाकल्याची घडल्याची घटना समोर आली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी देशभरामधून करण्यात येत आहे.