ETV Bharat / bharat

दाऊदला कोरोनाची लागण झाली नाही, भावाने दिली फोनवरून माहिती - Dawood Ibrahim CORONA

दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या अहवालातूनही समोर येत होती. त्याच्या कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा रक्षकांना क्वारंटाईन केल्याचेही गुप्तचर विभागाद्वारे सांगण्यात येत होते.

दाऊद इब्राईम
दाऊद इब्राईम
author img

By

Published : Jun 5, 2020, 9:56 PM IST

नवी दिल्ली - भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राईम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असून त्याला पाकिस्तानमधल्या कराची शहरातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती माध्यमांमध्ये येत आहे. गुप्तचर विभागानेही यासंबधी माहिती दिली होती. मात्र, दाऊदला कोरोनाची लागण झाली नसल्याचे दाऊदचा भाऊ अनिस इब्राईमने आयएनएसशी बोलताना सांगितले.

अज्ञात स्थळावरून त्याने बोलताना सांगितले की, कोरोना जरी घातक आजार असला तरी दाऊद आणि कुटुंबीय कोरोनापासून सुरक्षित आहेत. पाकिस्तानात आणि युएईमध्ये व्यवसाय चालवत असल्याचेही त्याने मान्य केले. अनिस हा दाऊद गँगच्या आंतरराष्ट्रीय कारवाया आणि आर्थिक व्यवहार सांभाळतो. दाऊदला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त त्याने फेटाळून लावले.

दाऊद पाकिस्तानात लपून बसल्याचे समजले जाते

दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या अहवालातूनही समोर येत होती. त्याच्या कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा रक्षकांना क्वारंटाईन केल्याचेही गुप्तचर विभागाद्वारे सांगण्यात येत होते. दाऊद कराचीत राहत असल्याची माहिती अनेक वेळा समोर आली आहे. 1993 मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांसाठी दाऊद भारताला हवा आहे. मात्र, दाऊद आणि त्याचे कुटुंबीय पाकिस्तानात राहत असल्याचे वृत्त पाकिस्तान कायम फेटाळत आला आहे.

दाऊदच्या गँगला डी कंपनी असेही म्हटले जाते. या संघटनेतील शार्पशुटर छोटा शकील हा देखील पाकिस्तानात राहत असल्याचे समजले जाते. छोटा शकील खंडणी आणि आंतराष्ट्रीय सट्टा लावण्याचे काम पाहतो. ' भाई(दाऊद) आणि छोटा शकील दोघेही ठीक आहेत. कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही. कुटुंबातील कोणीही दवाखाण्यात भरती करण्यात आले नाही, असे अनिसने सांगितले. त्याच्या ठिकाणा विषयी विचारले असता त्याने माहिती दिली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.