ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाचा आदिवासी महिलेवर बलात्कार - बलात्कार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात एका 21 वर्षीय आदिवासी तरुणीवर केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

बलात्कार
बलात्कार
author img

By

Published : Jul 31, 2020, 3:05 PM IST

रायपूर - छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात एका 21 वर्षीय आदिवासी तरुणीवर केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुलीचंद असे आरोपीचे नाव असल्याचे पोलीस निरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले.

घटनेची लेखी तक्रार पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही त्वरित कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला सुकमा येथे न्यायालयीन रिमांडसाठी पाठविले आहे, असे एसडीओपी अखिलेश कौशिक यांनी सांगितले.

27 जुलै रोजी निमलष्करी दलाच्या दुब्बाकोटा छावणीजवळ हा प्रकार घडला होता. पीडित तरुणी आपल्या बहिणीसोबत जनावरांना चारा खाऊ घालण्यासाठी तिथे गेली होती. बहिणीनं कशीबशी आपली सुटका केली. मात्र, आरोपीने तरुणीवर बलात्कार केला, असे आदिवासी नेते मंगल राम यांनी सांगितले. आदिवासी महासभेने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.