ETV Bharat / bharat

कोविड-१९ : एका दिवसात पार पडल्या सात लाख चाचण्या, सर्वाधिक रुग्णांचीही नोंद.. - सर्वाधिक कोरोना चाचण्या

जास्त प्रमाणात चाचण्या झाल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही जास्त नोंदवली गेली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांमधील आरोग्य व्यवस्थांना ट्रॅकिंग, आयसोलेशन आणि परिणामकारक उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

COVID-19: India touches a new peak of 7,19,364 tests in a day
कोविड-१९ : देशात एका दिवसात पार पडल्या सात लाखांहून अधिक चाचण्या!
author img

By

Published : Aug 9, 2020, 10:13 PM IST

नवी दिल्ली : रविवारी देशात सात लाखांहून अधिक कोरोना चाचण्या पार पडल्या. ही एका दिवसातील चाचण्यांची सर्वोच्च संख्या आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सहा लाखांवर चाचण्या होत होत्या. आज मात्र आधीचे सर्व उच्चांक मोडत ७ लाख १९ हजार ३६४ चाचण्यांची नोंद झाली.

जास्त प्रमाणात चाचण्या झाल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही जास्त नोंदवली गेली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांमधील आरोग्य व्यवस्थांना ट्रॅकिंग, आयसोलेशन आणि परिणामकारक उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्राची टेस्ट-ट्रॅक-ट्रीट या पद्धतीचे अनुकरण करण्यासही राज्यांना सांगण्यात आले आहे.

देशात एका दिवसातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद..

रविवारी देशात ६४ हजार ३९९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २१ लाख ५३ हजार दहावर पोहोचली आहे. यांपैकी १४ लाख ८० हजार ८८५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, ६ लाख २८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज नोंद झालेल्या ८६१ मृत्यूंनंतर, आतापर्यंत एकूण बळी गेलेल्या रुग्णांची संख्या ४३ हजार ३७९वर पोहोचली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.