ETV Bharat / bharat

#Covid19 देशात 4 लाख 80 हजार 719 रुग्णांवर उपचार सुरू; तर मृत्यू दर 1.47 टक्के

author img

By

Published : Nov 14, 2020, 1:45 PM IST

देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 29 हजार 188 जणांचा बळी गेला आहे. तर मृत्यूदर 1.47 टक्के इतका झाला आहे. तर 4 लाख 80 हजार 719 जणांवर उपचार सुरू आहेत. याचबरोबर कोरोना लस संशोधनासाठी स्वतंत्रपणे 900 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार होत असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात एकूण 87 लाख 73 हजार 479 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात 81 लाख 63 हजार 572 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशातील रिकव्हरी रेट 93.04 वर पोहचला आहे. याचबरोबर कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 29 हजार 188 जणांचा बळी गेला आहे. तर मृत्यू दर 1.47 टक्के इतका झाला आहे. दरम्यान, 4 लाख 80 हजार 719 जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

सर्वांत जास्त रुग्ण महाराष्ट्रात सापडले असून सध्या 85 हजार 45 रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत 16 लाख 9 हजार 607 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 45 हजार 809 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. 28 हजार 45 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 8 लाख 18 हजार 392 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Covid LIVE
2 हजार 91 प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या

2 हजार 91 प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या -

देशात आतापर्यंत 12 कोटी 40 लाख 31 हजार 230 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत. तर शनिवारी 9 लाख 29 हजार 491 चाचण्या दिवसभरात झाल्या आहेत. देशात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर फक्त एकच प्रयोगशाळा होती. मात्र, आता सरकारी 1 हजार 146 आणि खासगी 945 अशा एकूण 2 हजार 91 प्रयोगशाळा आहेत.

Covid LIVE
देशातील कोरोना रुग्णांची संख्या

लसीच्या संशोधनाकरता 900 कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा करताना कोरोना लस संशोधनासाठी स्वतंत्रपणे 900 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली आहे. हा निधी स्वतंत्रपणे जैवतंत्रज्ञान विभागाला देण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सिरम आणि आयसीएमआर या दोन्ही संस्था संयुक्तपणे कोरोनावरील लसीच्या वैद्यकीय चाचण्या देशात घेणार आहेत. चाचणीचा खर्च सरकारी संस्था असलेली आयसीएमआर करत आहे. तर कोव्हिशिल्ड लसीवरील इतर खर्च हा सिरमकडून केला जात आहे. एसआयआय आणि आयसीएममारकडून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या देशातील 15 विविध केंद्रांवर घेण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या 1 हजार 600 स्वयंसेवकांची नोंदणी 31 ऑक्टोबरला करण्यात आली आहे.

हेही वाचा - प्रदूषणाची पातळी वाढली; पूर्व दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक 337 वर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.