चांगली झोप-चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी उत्कृष्ट औषध..
कोरोना साथीच्या उद्रेकाची भीती आणि परिणामांमुळे लोकांवर तणाव वाढत असून ते चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या झोपेवर परिणाम होत आहे. जर झोप कमी असेल तर, प्रतिकारशक्ती कमी होते आणि शरिर विषाणुमुळे संसर्गग्रस्त होण्याची शक्यता जास्त असते. याचा परिणाम शारिरिक आणि मानसिक शहाणपणावर होतो. शारिरिक अंतर राखणे आणि हात धुण्याइतकेच जे आज कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी वापरले जाते, तितकीच झोपही महत्वाची आहे, असे मज्जासंस्थेसंबंधी मानसोपचारतज्ञ स्पष्टपणे सांगतात. आरामशीर झोप लागण्यासाठी खाली दिलेल्या सहा युक्त्या तुम्हाला मदत करतील..
- घाबरू नका ..
कोरोना साथीच्या उद्रेकामुळे, अनेक लोक त्यांचा रोजचा दिनक्रम बदलत आहेत. अनेक जण नोकऱ्या गमावत आहेत. काहींना घरून काम करण्याची सवय लागली आहे. योग्य शालेय शिक्षणाच्या ऐवजी मुलांना घरातच शिक्षण दिले जात असल्याने अनेक जण चिंतित आहेत. कोणत्या प्रकारच्या स्थितीत आणि विचार तुम्हाला सतावत असतील तरीही, हे विचार तुमच्या झोपेवर परिणाम करणार नाहीत, याची खात्री करा. जितके शक्य होईल तितके पूर्वी ज्या मार्गाने तुमची कार्यशैली होती, तितकाच वेळ घालवा. जर तुम्ही घरून काम करत असाल तर, जागे व्हा आणि पूर्वी जसे करत होतात त्याच पद्धतीने तयारी करा. कार्यालयात जाण्यासाठी सकाळी लवकर उठत असाल तर, आताही अगदी दुसऱ्या खोलीत लॅपटॉपवर काम करण्यासाठी जायचे असले तरीही अगदी त्याच पद्धतीने उठून कार्यालयात जाण्यासाठी तयार व्हा.
- वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे ..
हे दिवस असे आहेत की तुम्हाला घरी वेगळे आणि एकटे सोडून दिले आहे. अगदी प्रत्येक लहान संधी मिळाली की तुम्हाला झोपावे वाटणार, हे अगदी नैसर्गिक आहे. पण स्वतःला या मोहाला बळी पडू देऊ नका. तुम्ही बाहेर जाऊन काम करत होतात, अगदी तेव्हाचाच नित्यक्रम चालू ठेवा. घरून काम करणाऱ्यांसाठी नित्यक्रम तसाच असला पाहिजे.
- व्यायाम करणे सक्तीचे ..
लॉकडाऊनमुळे तुमचे जिम बंद झाले आहे. तरीसुद्धा, तुमचा व्यायाम थांबता कामा नये. योग्य प्रमाणात झोपेसाठी नियमित व्यायाम महत्वाचा आहे. दिवसा तुम्ही व्यायाम केला असेल तर त्यामुळे तुम्हाला निश्चितच यशस्वी पूर्तता केल्याचे समाधान मिळेल. मात्र, झोप घेण्यापूर्वी शरिराच्या नेहमीच्या कार्यशैलीत अडथळा आणणे योग्य नाही. त्यामुळे झोपेतही वारंवार अडथळा येत राहिल. म्हणून, झोपण्यासाठी शयनगृहात जाण्यापूर्वी व्यायाम करणे टाळा. शारिरीक आरामदायक स्थितीत शयनगृहात जा.
- कोरोनासंबंधी बातम्या टीव्हीवर पहाणे टाळा ..
या दिवसांत, प्रत्येक वाहिनी ही कोरोनासंबंधी बातम्यांनी भरलेली आहे. टीव्हीवरील बातम्या सातत्याने पहाण्यामुळे मनावरील चिंता आणि तणाव वाढतो. विश्वासार्ह माध्यमांमधील विश्वासार्ह बातम्या पहाणे- यासाठी डिजिटल किंवा वृत्तपत्रांतील-हाच एक मार्ग आहे. तुम्हाला जितक्या प्रमाणात बातम्या पहाण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी आघाडीची वृत्तपत्रे वाचा. शक्य तितके फोन पहाणे टाळा. तसेच, झोपेला जाण्यापूर्वी कोणत्याही माध्यमांतील कोरोनासंबंधी बातम्या न पहाणे चांगले आहे.
- झोपेपूर्वी इंटरनेट पहाणे थांबवा ..
विशेषतः जेव्हा आपण घरातच वेळ घालवत आहोत, तेव्हा इंटरनेट हा माहिती आणि करमणुकीचा महान स्त्रोत आहे, यात काही शंका नाही. तरीसुद्धा, दिवसभर इंटरनेटवर सातत्याने माहिती शोधत रहाणे तुमच्या आरोग्यावर अत्यंत अशुभ परिणाम करणारे सिद्ध होईल. दिवसाच्या अखेरीस तुमच्या झोपेत त्याचा मोठाच अडथळा निर्माण होईल. झोपेला जाण्याच्या एक तास अगोदर तुम्ही आपला मोबाईल फोन दूर ठेवा आणि टीव्ही बंद करणे महत्वाचे आहे. मात्र, पुस्तक वाचणे किंवा संगीत ऐकणे तुमचा झोपेचा आकृतीबंध सुधारण्यास मदत करू शकते.
- मद्यप्राशन आरोग्य आणि झोपेसाठी धोकादायक ..
मद्यप्राशन केल्याने चांगली झोप लागते, या चुकीच्या समजुतीत सहसा अनेक जण असतात. मद्यप्राशनाच्या सुरूवातीच्या अवस्थेत तसे वाटत असले तरीही, नंतरच्या अवस्थेत तुम्ही कधीही योग्य झोप घेऊ शकत नाहीत. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, अतितणावात आणि चिंतित असताना मद्य प्राशन केल्याने आणि झोपेला पारखे झाल्याने मानवी शरिरातील प्रतिकारशक्ती आणखी ढासळते. म्हणून, शक्य तितके मद्यप्राशनापासून दूर रहाणे हे जास्त सुरक्षित आहे.
हेही वाचा : COVID-19 : केरळ आता करणार 'प्लाझ्मा थेरपी'..