नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने कोविड 19 काळात मोदी सरकारने स्थापन केलेल्या पीएम केअर्स फंडाला नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फंडात (एनडीआरएफ) वळते करण्यासाठीची याचिका मंगळवारी फेटाळून लावली.
न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील व न्यायमूर्ती आर. एस. रेड्डी आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. एनडीआरएफला स्वतंत्र असा फंड असल्याने पीएम केअर्स फंडाचा निधी वळता करण्याची आवश्यकता नाही.
यावर या खंडपीठाने खालील प्रश्न उपस्थित केले
- केंद्र सरकारने नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फंड (एनडीआरएफ) साठी निधी दिला आहे का?
- पीएम केअर्स फंडातील सर्व निधी नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फंडासाठी आहे का?
- पीएम केअर्स फंडातील सर्व निधी नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फंडासाठी वापरणार का?
ही जनहित याचिका सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन या समाजसेवी संस्थेने दाखल केली होती. कोविड 19 काळात मोदी सरकारने 28 मार्च 2020 ला स्थापन केलेल्या पीएम केअर्स फंडातील सर्व जमा निधी नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फंडात (एनडीआरएफ) वळते करण्यासाठी ही याचिका दाखल केली होती.