नवी दिल्ली - देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून कोरोना रुग्णांची संख्या 12 लाखाच्या जवळ पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 37 हजार 724 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 648 जणांचा मृत्यू झाला.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 11 लाख 92 हजार 915 वर पोहचली आहे. तर यामध्ये 4 लाख 11 हजार 133 सक्रिय रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत उपचारानंतर तब्बल 7 लाख 53 हजार 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 28 हजार 732 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे.
देशातील राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रात आतापर्यंत 12 हजार 276 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 3 लाख 27 हजार 31 वर गेली आहे. यातील एकूण 1 लाख 32 हजार 538 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 82 हजार 217 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 25 हजार 96 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 3 हजार 690 जणांचा बळी गेला आहे. या पाठोपाठ गुजरात राज्यात 50 हजार 379 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 196 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 80 हजार 643 कोरोनाबाधित तर 2 हजार 626 जणांचा बळी गेला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये 1 हजार 229 , पश्चिम बंगालमध्ये 1 हजार 182 तर कर्नाटकमध्ये 1 हजार 464 जणांचा बळी गेला आहे.