नवी दिल्ली - देशातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या 24 तासांत 21 हजार 131 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 97 लाख 82 हजार 669 पेक्षा अधिक आहे. तर 279 जणांचा बळी गेला असून 20 हजार 21 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रिकव्हरी रेट 95.83 वर तर मृत्यू दर 1.45 आहे.
देशात आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची एकंदर संख्या 1 कोटी 2 लाख 7 हजार 871 हून अधिक आहे. सध्या देशात, 2 लाख 77 हजार 301 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचा भारतात प्रसार झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णांची संख्या सर्वात कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आजघडीला मृतांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 901 वर पोहोचली आहे.
जागतिक कोरोना संकटाविरुद्धच्या या लढाईत भारताने अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. गेल्या 6 महिन्यांत कोरोनाच्या नवीन बाधितांच्या दैनंदिन संख्येत लक्षणीय घट होऊन, ही संख्या 20 हजारांपेक्षा कमी झाली आहे. त्याबरोबरच उपचाराखालील रुग्णाची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे.
कोरोना चाचण्यांचा आकडा -
राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्रात सर्वांत जास्त 49 हजार 255 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 66, पश्चि बंगालमध्ये 29, केरळात 25 नव्या रुग्णांची नोंद झाली. रविवारी दिवसभरात 7 लाख 15 हजार 397 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण 16 कोटी 88 लाख 18 हजार 54 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.
रुग्णांचा वाढता क्रम -
कोरोना रुग्णांनी 7 ऑगस्टला 20 लाख, 23 ऑगस्टला 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख, 16 सप्टेंबरला 50 लाख, 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोंबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख आणि 20 नोव्हेंबरला 90 लाखाचा टप्पा पार केला. तर 19 डिसेंबरला एक कोटीचा टप्पा ओलांडला.
हेही वाचा - "काँग्रेसच्या 136 व्या स्थापना दिवशीच राहुल गांधी 'नौ दो ग्यारह'