ETV Bharat / bharat

COVID -19 : जयपूर, पुणे अन् केरळमध्ये आढळले नवे रुग्ण; देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५९ वर - भारत कोरोना केसेस

देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज एकाच दिवसामध्ये महाराष्ट्रात तीन, राजस्थानमध्ये एक, केरळमध्ये आठ, तर कर्नाटकात तीन नवे रुग्ण आढळून आले.

COVID 19 outbreak in India number of cases rise above sixty
COVID -19 : जयपूर, पुण्यात आढळले नवे रूग्ण; देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साठवर..
author img

By

Published : Mar 10, 2020, 8:08 PM IST

Updated : Mar 10, 2020, 8:56 PM IST

नवी दिल्ली - मंगळवारी पुण्यात कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले. तर, जयपूरमध्येही आणखी एका रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यासोबतच कर्नाटकात तीन, आणि केरळमध्ये आठ नवे रुग्ण आज आढळून आले आहेत. त्यामुळे देशभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ५९पर्यंत पोहोचली आहे.

देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज एकाच दिवसामध्ये महाराष्ट्रात तीन, राजस्थानमध्ये एक, केरळमध्ये आठ, तर कर्नाटकात तीन नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली असून, केरळमध्ये १४, कर्नाटकात ४, पंजाबमध्ये एक, आणि राजस्थानमध्ये याचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील एकूण रुग्णांमध्ये इटलीच्या १५ नागरिकांचाही समावेश आहे.

या रुग्णांपैकी केरळमधील तीन रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, जयपूरमध्ये असणाऱ्या इटालियन दाम्पत्यापैकी पत्नीलाही कोरोना नसल्याचे नव्या तपासणीत समोर आले आहे. बाकी सर्व रुग्णांचीही प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा : इटलीतील कोरोनाग्रस्त दाम्पत्यातील पत्नीची टेस्ट 'निगेटिव्ह'; पती अजूनही 'पॉझिटीव्ह'

Last Updated : Mar 10, 2020, 8:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.