ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - भारत कोरोना मृत्यू

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ८५ लाखांच्या पुढे गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे यातील ७८ लाख ६८ हजार ९६८ हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

भारत कोरोना अपडेट
भारत कोरोना अपडेट
author img

By

Published : Nov 9, 2020, 5:49 AM IST

हैदराबाद - देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ८५ लाखांच्या पुढे गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे यातील ७८ लाख ६८ हजार ९६८ हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९२.४९ टक्के झाला आहे. भारत आणि नेपाळ देशांतील सबंध आणखी मजबूत करण्यासाठी काल (रविवार) भारताने नेपाळला २८ आयसीयू व्हेंटिलेटर भेट दिले.

भारत कोरोना अपडेट
भारत कोरोना अपडेट

दिल्ली -

राजधानी दिल्लीत सध्या कोरोनाची तिसरी लाट आली असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारने खासगी रुग्णालयाती ८० टक्के खाटा आरक्षित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हॉटेल आणि इतर हॉल ताब्यात घेण्याचा अद्याप कोणताही विचार नसल्याचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले.

महाराष्ट्र -

राज्यात काल (रविवारी) ५०९२ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ८२३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात एकूण ९६ हजार ३७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. काल ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गुजरात -

शनिवारी अहमदाबाद महानगरपालिकेने कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८ रुग्णांवर गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व रुग्ण गृह विलगीकरणात असताना घराबाहेर पडले होते. त्यातील पाच जणांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांपेक्षा शनिवारी नवे रुग्ण जास्त आढळले. त्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे.

कर्नाटक -

देशात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर चित्रपट क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. बंगळुरु शहरातील सर्व चित्रपटगृहे टाळेबंदीनंतर बंद होती. ती १५ ऑक्टोबरला उघडण्यात आली आहेत. तब्बल सात महिन्यानंतर चित्रपटगृहे चालू झाली असली तर प्रेक्षक आणि नव्या चित्रपटांअभावी उद्योगाचे नुकसान होत आहे.

तामिळनाडू -

तामिळनाडूत रविवारी २ हजार ३३४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ७ लाख ४३ हजार झाली आहे. दिवाळीच्या काळात कोरोनाचा प्रसार कसा नियंत्रणात आणावा यावर राज्य सरकार काम करत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आत्तापर्यंत राज्यातील ७ लाख १३ हजार नागरिक बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ३४४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.