ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - india corona update

देशातील एकूण रुग्णांपैकी ५ लाख २७ हजार ९६२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ७७ लाख ११ हजार ८०९ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे देशात आत्तापर्यंत १ लाख २४ हजार ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता ९२.०९ टक्के झाला असून मृत्यू दर १.४९ टक्के आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 6, 2020, 4:26 AM IST

हैदराबाद - मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे ५० हजार २१० रुग्ण आढळून आले असून ७०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता ८३ लाख ६४ हजार ८६ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

pic
कोरोना अपडेट

देशातील एकूण रुग्णांपैकी ५ लाख २७ हजार ९६२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ७७ लाख ११ हजार ८०९ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे देशात आत्तापर्यंत १ लाख २४ हजार ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता ९२.०९ टक्के झाला असून मृत्यू दर १.४९ टक्के आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने बुधवारी एका दिवसात १२ लाख ०९ हजार ४२५ कोरोना चाचण्या केल्या. देशात आत्तापर्यंत ११ कोटींपेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दिल्ली -

सणासुदीमुळे आणि वाढत्या प्रदुषणामुळे दिल्लीतील कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याबरोबरच वैद्यकीय सुविधा सुधारण्यावर त्यांनी भर दिला आहे. दिल्लीत काल दिवसभरात सहा हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आत्तापर्यंत शहरात ४ लाख ०९ हजार ९३८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र -

कोरोना रुग्ण सापडण्याचे राज्यातील प्रमाण कमी होत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. राज्यात काल (गुरुवार) ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ११७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे एकूण ४४, ८०४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०७ टक्के

राज्यात काल ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०७ टक्के एवढे झाले आहे. काल राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राजस्थान -

राज्यातील दौसा येथील तुरुंगातील १०७ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आणखी १३० कैद्यांच्या चाचणीचा अहवाल येणे बाकी आहे. कैद्यांबरोबर तुरुंग प्रशासनातील कर्मचाऱ्यांचीही चाचणी घेण्यात येत आहे. गुरुवारी २८ कैद्यांना लागण झाल्याचे समोर आले. लागण झालेल्या सर्व रुग्णांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

तामिळनाडू -

मागील २४ तासांत तामिळनाडू राज्यात २ हजार ३४८ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७ लाख ३६ हजार झाली आहे. तर ११ हजार २७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीत राज्यात १९ हजार ६१ कोरोना अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

झारखंड -

मागील २४ तासांत झारखंड राज्यात कोरोनाचे ३०१ नवे रुग्ण आढळून आले. तर ५०५ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३ हजार १८८ झाली आहे. त्यातील सुमारे ९७ हजार रुग्ण बरे झाले असून ४ हजार ८०० अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत ८९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.