ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

मागील २४ तासांत देशात ५८ हजार ३२३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. याबरोबरच देशातील एकूण बरे झालेल्यांची संख्या ७६ लाखांच्या पुढे गेली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता ९१. ९६ टक्के झाला आहे. ३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या एक महिन्याच्या काळात केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल, मनिपूर राज्यात रुग्णसंख्या वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Nov 4, 2020, 3:31 AM IST

हैदराबाद - आत्तापर्यंत देशात कोरोनाचे ८२ लाख ६७ हजार ६२३ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १ लाख २३ हजार ९७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ७६ लाख ३ हजार १२१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत देशात ५ लाख ४१ हजार ४०५ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत ६.५५ टक्के अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याला यश येत असून अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या साडेपाच लाखांच्या खाली आली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढल्याने अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

दिल्ली -

दिल्लीतून देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना आता कोरोना चाचणी करता येणार आहे. प्रवासाआधी चाचणीची सोय करण्यात आल्याचे दिल्ली विमान प्रशासनाने सांगितले आहे. विमानतळावर चाचणी करण्याची सोय १२ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, आधी फक्त आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाच चाचणी करता येत होती.

महाराष्ट्र -

राज्यात काल (मंगळवार) 4 हजार 909 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाली आहे तर 120 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 44 हजार 248 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.61 टक्के एवढा आहे. राज्यात मंगळवारी 6 हजार 973 रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण 15 लाख 31 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.46 टक्के एवढे झाले आहे.

उत्तर प्रदेश -

उत्तर प्रदेशातील आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य आयुक्त अमित मोहन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना संजय गांधी पोस्ट ग्रज्युएट इन्स्टिट्युट ऑफ सायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाची माहिती देण्याचे काम त्यांच्याकडे होते.

कर्नाटक -

राज्यात नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून वाढत आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातील आणि कोविड केअर सेंटरमधील खाटा मोठ्या संख्येने रिकाम्या होत आहे. बृहत बंगळुरू महानगर पालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात ७० टक्के खाटा रिकाम्या आहेत. १२ हजार २०७ खाटांपैकी सुमारे साडेआठ हजार खाटा मोकळ्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.