ETV Bharat / bharat

देशातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

देशात मागील 24 तासात 776 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 96 हजार 318 एवढी झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 84 हजार 877 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा एकूण 51 लाखांवर पोहचला आहे.

author img

By

Published : Sep 30, 2020, 2:19 AM IST

देशातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
देशातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

हैदराबाद - देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. मागील 24 तासात देशात 70 हजार 589 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आजपर्यंत देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 61 लाखांच्या वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. देशात मागील 24 तासात 776 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 96 हजार 318 एवढी झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 84 हजार 877 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा एकूण 51 लाखांवर पोहचला आहे.

कोरोनाची सद्यस्थिती
कोरोनाची सद्यस्थिती

महाराष्ट्र -

मुंबई - महाराष्ट्राला सलग दुसऱ्या दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये १९ हजार २१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १४ हजार ९७६ नवे कोरोनाबाधित मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. कालही कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. आत्तापर्यंत राज्यात १० लाख ६९ हजार १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.२६ टक्के इतके झाले आहे.

नवी दिल्ली - शासकीय रुग्णालयांमध्ये खाटांच्या संख्या वाढवण्यात येत असल्याची माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी आज दिली. खासगी आणि शासकीय रग्णांलयांमध्ये मिळून एकूण 1 हजार खाटा वाढवण्यात आल्या आहेत. दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

तामिळनाडू -

चेन्नई - राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. एआयएडीएमकेने ट्विटरवर जाहीर केले की, राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामध्येही आणखी शिथिलता देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ओडिशा -

भुवनेश्वर - ओडिशा विधानसभेच्या मंगळवारपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनापूर्वी उपसभापती रजनीकांत सिंह आणि तीन मंत्र्यांसह 15 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. ओडिशामध्ये आतापर्यंत नऊ मंत्र्यांसह 50 आमदारांना कोरोनाची लागण झाली होती.

उत्तराखंड -

डेहराडून - हरिद्वार मध्यवर्ती कारागृहातील तब्बल 61 कैद्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

मध्य प्रदेश -

भोपाळ - डाबराचे उपविभागीय दंडाधिकारी राघवेंद्र पांडे यांचे मंगळवारी कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल आहे. मंगळवारी राज्यात 449 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 23 हजार 524 इतकी आहे. त्यापैकी 4 हजार 456 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.