हैदराबाद - कोरोनाविरोधात भारतील लोकसंख्या 'हर्ड इम्युनिटी' मिळण्यापासून आणखी दूर असल्याचे मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केले आहे. हर्षवर्धन यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सेरो सर्व्हे (Sero Survey) दाखला दिला आहे. आयसीएमआरचे पथक कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याच्या प्रकरणांचा अभ्यास करत आहे. याक्षणी पुन्हा कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण नगण्य आहे. मात्र, तरी सरकारला या प्रकरणाचे महत्त्व पूर्णपणे समजले असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, गेल्या 24 तासांत देशात 89 हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. या आठवड्यातील हा रुग्णसंख्येचा हा सर्वात जास्त उच्चांक आहे. या आठवड्यातील प्रकरणांची दैनिक संख्या आतापर्यंत गेल्या आठवड्यात नोंदविलेल्या संख्येच्या खाली राहिली आहे. या संसर्गाची तीव्रता शिगेला गेल्याची शक्यता दर्शवित आहे. मात्र, बऱ्याच राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.
दिल्ली -
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत कोरोनाच्या टेस्टिंगची संख्या 3 पट वाढली आहे. सध्या दिवसात 60 हजार टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर मात करण्यासाठी ही नवीन रणनीती असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्लीत दरदिवशी 60 हजार टेस्ट करण्यात येत आहेत. आमच्या कंटेंटमेंट धोरणामधील हा मोठा बदल आहे. दिल्लीचा दुप्पट दर हा 50 दिवसांचा आहे, अशी माहितीही जैन यांनी दिली. दिल्लीत दिवसात 46 रुग्णांची नोंद करण्यात आल्यानंतर हे निवेदन आहे. 16 जूनपासूनचा सर्वात जास्त आकडेवारी होती. जेव्हा 93 मृतांची नोंद करण्यात आली होती.
बिहार -
पटना - येथील पटना विमानतळावर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिहार काँग्रेस अध्यक्ष मदन मोहन झा आणि अनेक पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रविवारी अधिकाऱ्यांनी दिली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील रणतीनीसाठी पक्षाचे नेते पटना येथे आले. त्यांच्या स्वागतासाठी तेथील नेत्यांनी शनिवारी विमानतळावर एकत्र येत गर्दी करत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले.
कर्नाटक -
बंगळुरू - काँग्रेस नेते आणि राज्य विधानसभेचे सदस्य दिनेश गुंडू राव यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर त्यांनी स्वत:ला पुढचे 10 दिवस क्वारंटाईन ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, 'मला आज कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे मी पुढचे 10 दिवस स्वत:ला क्वारंटाईन राहणार आहे.'
राज्याचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी विनंती केली आहे, जे त्यांच्या संपर्कात आले असतील, त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी.
उत्तराखंड -
देहरादून - भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या संपर्कात जे आले असतील त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
त्या म्हणाल्या, 'मी नुकतीच हिमालयातील प्रवासात करून आली. तीन दिवसांपासून मला हलका ताप होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
सध्या हरिद्वार आणि ऋषिकेशच्यामध्ये असलेल्या वंदे मातरम कुंज याठिकाणी क्वांरटाईन आहे. चार दिवसांनंतर पुन्हा कोरोना टेस्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जर परिस्थिती सारखीच असली तर मग डॉक्टरांचा सल्ला घेईल, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.