हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या या महासंकटावर मात करताना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसेच जगाला आश्वस्त केले की, भारत त्याच्या उत्पादन आणि वितरण क्षमतेचा उपयोग करून सर्व मानवतेला या प्राणघातक रोगाशी लढण्यासाठी मदत करेल.
ते म्हणाले, गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या या महासंकटाशी लढत असताना या संयुक्त लढाईत संयुक्त राष्ट्रसंघ कुठे आहे? त्याचा प्रभावी प्रतिसाद कुठे आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या पात्रातील सुधारणा ही काळाची गरज असल्याचे मोदी म्हणाले.
दरम्यान, देशात मागील 24 तासांत 85 हजार 362 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर याबरोबरच देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 59 लाखांवर गेली आहे. तर 1 हजार 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण मृतांची संख्या 93 हजार 379 इतकी झाली.
सध्या देशात 9 लाख 60 हजार 969 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 48 लाख 49 हजार 585 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांनी सुटी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असून तो सध्या 82.14 टक्के इतका आहे. तर मृत्यूदर 1.58 टक्के इतका आहे.
दिल्ली -
नवी दिल्ली - उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना डेंग्यु आणि कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
अहवालानुसार, सिसोदिया यांना साकेतमधील खासगी मॅक्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागातून (आयसीयू) सामान्य वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. 48 वर्षीय आम आदमी पक्षाचे नेते सिसोदिया यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजस्थान -
जोधपूर - येथे कोरोनाची रुग्णसंख्येत आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दोघांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी येथे विकेंड लॉकडाऊन करण्यात आले. हे लॉकडाऊन रविवारपर्यंत राहील. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सध्याच्या परिस्थितीबाबत लोकांना माहिती देण्यासाठी शहरातील काही भागांत पथसंचलन केले. यावेळी त्यांनी कोरोनावर लोकांना घरात राहण्यासाठी विनंती केली.
मागील दोन दिवसांमध्ये जोधपूर शहरात 1 हजार 200 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यामुळे येथील आरोग्याच्या सुविधांच्या पायाभूत सुविधांवर दबाव वाढला आहे. दरम्यान, या महिन्यांत शहरात 150 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
ओडिशा -
भुवनेश्वर - राज्यांत शनिवारी आतापर्यंतच्या सर्वात जास्त 4 हजार 356 रुग्णांची नोंद करण्यात आली. याबरोबरच राज्यातील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 5 हजार 452 इतकी झाली आहे. तर शनिवारी 16 बाधितांचा मृत्यू झाला. याबरोबरच एकूण मृतांची संख्या 783 इतकी झाल्याची माहिती, राज्य आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
एकूण 4 हजार 356 या रुग्णांपैकी 2 हजार 529 रुग्णांची नोंद ही विविध क्वारंटाईन सेंटर्समधून करण्यात आली. तर बाकीचे रुग्ण हे संपर्कातून शोधण्यात आले असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील खुर्दा जिल्ह्यात 902, कटक जिल्ह्यात 409, अंगुल जिल्ह्यात 197 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 15 इतर जिल्ह्यांमध्ये 100 रुग्णांची नोंद मागील 24 तासांत करण्यात आली.
उत्तराखंड -
रुद्रपूर - जिल्हा रुग्णालयातून शनिवारी तीन तर अस्थायी कारागृहातून एक कैदी फरार झाला आहे. अहवालानुसार, त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना रुद्रपूर येथे हलविण्यात आले होते.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये शनिवारी 949 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. याबरोबरच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 46 हजार 281 इतकी झाली आहे.