नवी दिल्ली - देशभरात रविवारी कोरोनाचे 92,605 रुग्ण समोर आले असून एकूण बाधितांचा आकडा 54,00,620 इतका झाला आहे. 1,133 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृतांची संख्या 86,752 एवढी झाली आहे. सध्या देशात 10,10,824 सक्रिय रुग्ण असून 43,03,044 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारी 12 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात केलेल्या या सर्वाधिक चाचण्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
आत्तापर्यंत देशात 6.37 कोटी लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 94,612 कोरोना रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण वाढीपेक्षा बरे होणाऱ्यांची आजची संख्या जास्त आहे. कोरोनातून बरे होण्याचा दर देशात 79.68 टक्के आहे, अशी माहिती मंत्रालयाने दिली.
![कोरोना आकडेवारी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/8873365_imp_2109newsroom_1600637244_543.jpg)
- दिल्ली -
राजधानी दिल्लीत आज नवीन 4,071 कोरोना रुग्ण आढळून आले असून 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2.42 लाख कोरोना रुग्ण आज दिवसभरात सापडले आहेत. कोरोना मृतांची संख्या 4,945 इतकी झाली आहे. रविवारी 61,973 RT-PCR आणि अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत.
- जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरमध्ये 1,457 नवी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या 63,990 इतकी झाली आहे. रविवारी 14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 1,001 झाली आहे. 817 जम्मू विभागात तर 640 काश्मीर विभागात नवे रुग्ण सापडले आहेत.
- मध्य प्रदेश -
मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचे नवीन 2579 रुग्ण सापडले असून मृतांचा आकडाही वाढत असून आत्तापर्यंत 1970 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 81 हजार 374 रुग्ण आत्तापर्यंत कोरोनातून बरे झाले असून राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 22 हजार 300 इतकी आहे.
- राजस्थान -
कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच असल्याने राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सरकारने शनिवारपासून संचारबंदी (कलम १४४) लागू केली आहे. राज्यातील सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर ३१ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, अंत्यसंस्कारावेळी २० आणि लग्नकार्यामध्ये ५० लोकांना एकत्र येण्याची परवानगी आहे.
- कर्नाटक -
काँग्रेस आमदार प्रियांक खरगे यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते सध्या घरीच उपचार घेत आहेत. शुक्रवारी त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्याचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. याबाबत राज्य काँग्रेसकडून माहिती देण्यात आली.
- तेलंगणा -
कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या ७ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कर्मचाऱ्यांच्या नंतर आरोग्यमंत्र्यांनीही आपली चाचणी करून घेतली मात्र सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
हेही वाचा - राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला : आज २० हजार ५९८ नव्या रुग्णांची नोंद