ETV Bharat / bharat

देशात कोरोनाचा उद्रेक.! गेल्या २४ तासात ४७ हजार ७०३ नव्या रुग्णांची नोंद - corona positive patient in india

देशात गेल्या २४ तासांमध्ये देशात ४७,७०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १४ लाख ८३ हजार १५७ वर पोहोचली आहे. तसेच देशात आजवर एकूण ३३ हजार ४२५ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेल्याची नोंद झाली आहे.

COVID-19 news from across the nation
कोरोना अपडेट भारत
author img

By

Published : Jul 29, 2020, 5:51 AM IST

हैदराबाद - देशात गेल्या २४ तासांमध्ये देशात ४७,७०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १४ लाख ८३ हजार १५७ वर पोहोचली आहे. तसेच देशात आजवर एकूण ३३ हजार ४२५ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेल्याची नोंद झाली आहे. सोमवारपर्यंत देशात एकूण कोरोनाचे ४ लाख ९६ हजार ९८८ सक्रीय रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच आतापर्यंत ९ लाख ५२ हजार ७४३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

कोरोनाला मात देण्यासाठी देशभरात कोरोना चाचण्यांची वाढ करण्यात भर देण्यात येत आहे. याच दरम्यान सोमवारी देशात तीन हाय कॅपॅसिटी असणाऱ्या तीन लॅबचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे सोमवारी नोएडा, मुंबई आणि कोलकाता स्थित लॅबचं उद्घाटन केलं. या लॅबच्या माध्यमातून सुमारे १० हजार चाचण्या केल्या जाऊ शकतात.

जानेवारी महिन्यात देशात कोरोना टेस्टसाठी केवळ एक सेंटर होतं. मात्र, आज जवळपास १३०० प्रयोगशाळा संपूर्ण देशभरात कार्यरत आहेत. भारतात सध्या ५ लाखहून अधिक टेस्ट दर दिवशी होत आहेत. भारताने एका दिवसात पाच लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्याचा रेकॉर्ड केला आहे

COVID-19 news from across the nation
देशात गेल्या २४ तासात ४७ हजार ७०३ नव्या रुग्णांची नोंद

पाहूयात राज्यनिहाय देशातील कोरोनाची परिस्थिती...

महाराष्ट्र

  • मुंबई - महाराष्ट्रात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. महाराष्ट्रात सोमवारी १० हजार ३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. तर, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार २७७ झाली आहे.

राज्यात सोमवारी ७ हजार ७१७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३ लाख ९१ हजार ४४० अशी झाली आहे. सोमवारी नवीन १० हजार ३३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २ लाख ३२ हजार २७७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण १ लाख ४४ हजार ६९४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

झारखंड

  • रांची - राज्यातील पहिले प्लाझ्मा डोनेशन सेंटर राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (आरआयएमएस) मध्ये सुरू करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी या लॅबचे उद्घाटन केले. राज्यातील सध्याचा कोरोना वाढीचा दर हा ६.१ टक्के एवढा आहे.

राजस्थान

  • जयपूर - राज्यातील जोधपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे राज्य सरकराने आता क्लस्टर बेस्ड टेस्टिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. गेले १३ दिवस शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात सध्या सुमारे दहा हजार अ‌ॅक्टिव रुग्ण आहेत.

बिहार

  • पाटणा - राज्यातील कोरोना चाचण्या वाढवल्यानंतर आता राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा दरही वाढताना दिसून येत आहे. सध्याचा राज्याचा कोरोना वाढीचा दर ८.५२ टक्के आहे. पाटणामध्ये कोरोनाने सर्वाधिक थैमान घातले असून, शहरात आतापर्यंत सात हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, बिहारला आज ४३० ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटर्स मिळाले, ज्यांचा वापर कोरोना रुग्णांवरील उपचारात होणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी ३२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळणार आहेत.

दिल्ली

  • नवी दिल्ली - मंगळवारी राज्यात १ हजार ५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या १.३२ लाखांहून अधिक झाली आहे. तर राज्यातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३ हजार ८८१ वर पोहोचली आहे. दिल्लीतील अ‌ॅक्टिव रुग्णांची संख्या १० हजार ८८७ वर पोहोचली आहे.

दिल्लीतील कोरोना प्रसाराचा वेग कमी झाला असला, तरी शहरातील कन्टेन्मेंट झोन्सची संख्या वाढतच चालली आहे. मंगळवारपर्यंत शहरातील एकूण कन्टेन्मेंट झोन्सची संख्या ७१३ झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.