हैदराबाद - गेल्या 24 तासात भारतात कोरोनाच्या 38,444 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 12 लाखांच्या उबंरठ्यावर आहे. तसेच आतापर्यंत देशात 7.5 लाख कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले असून देशात सध्या 4.1 लाख सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कोरोना विषाणूसोबत सामना करण्यासाठी आणि अधिक चांगली धोरणे आखण्यासाठी दर महिन्याला सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे, दिल्ली सरकारने बुधवारी सांगितले. तसेच मध्य प्रदेशात, विशेषत: भोपाळमध्ये कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे राज्य सरकारने बुधवारी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राजधानीत दहा दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा कहर.! दिवसभरात तब्बल १० हजार ५७६ नव्या रुग्णांची नोंद
महाराष्ट्र :
- मुंबई - महाराष्ट्रात 19 जुलै रोजी एकाच दिवसात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली होती. हा उच्चांक बुधवारी मोडीत निघाला. बुधवारी राज्यात 10 हजार 576 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदाच दिवसभरात इतक्या रुग्णांची नोंद झाली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिवसभरातील कोरोना रुग्णांची जाहीर केली. राज्यात आज (22 जुलै) 10 हजार 576 इतके कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3 लाख 37 हजार 607 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 5 हजार 552 इते रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 87 हजार 769 इतके रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 36 हजार 980 इतके रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
नवी दिल्ली :
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कोरोना विषाणूसोबत सामना करण्यासाठी आणि अधिक चांगली धोरणे आखण्यासाठी दर महिन्याला सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे, दिल्ली सरकारने बुधवारी सांगितले.
उत्तराखंड :
- डेहराडून - खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार यासाठी किमान शुल्क आणि स्वतंत्र वॉर्ड आदी गोष्टींबाबत उत्तराखंड सरकारने मंगळवारी नियमांसह मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचनांनुसार को-मॉर्बिड कोविड पॉझिटिव्ह रूग्णाला उपचार देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
झारखंड :
- रांची - झारखंड भाजपचे आमदार सी. पी. सिंग यांनी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी देखील कोरोना चाचणी करावी, असे आवाहन केले आहे. तसेच भाजपच्या एका ज्येष्ट नेत्याने जे सध्या घरातच आयसोलेटेड आहेत, त्यांनी देखील आपण लवकरच ज्यांना ज्यांना भेटलो त्यांची यादी देऊ, असे सांगितले आहे.
बिहार :
- पटना - बिहारमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण वाढतच असूवन. यात आता सिविल सर्जन आर. आर. झा आणि समस्तीपूर जिल्ह्यातील विधानपरिषद सुनील कुमार सिंग यांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. आर. झा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना पाटण्यातील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्यांचे निधन झाल्याचे समस्तीपूरचे प्रभारी सिव्हिल सर्जन डॉ. सतीशकुमार सिन्हा यांनी बुधवारी सकाळी सांगितले.
ओडिशा :
- भुवनेश्वर - कोविड विरुद्ध सुरू असलेल्या लढाईसाठी अधिक निधी जमा करण्यासाठी ओडिशा सरकारने वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (सीएएमपीए) आणि ओडिशा मिनरल बेअरिंग एरियाज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (ओएमबीएडीसी) कडून निधी घेणार आहे. या अगोदरच ओडिशा सरकारने कोरोनाच्या उपाययोजनांसाठी 1 हजार 912 कोटी रुपये खर्च केले आहेत.
मध्यप्रदेश :
- भोपाळ - तसेच मध्य प्रदेशात, विशेषत: भोपाळमध्ये कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे राज्य सरकारने बुधवारी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राजधानीत दहा दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. 24 जुलैच्या रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरु होणार आहे.
'कोविड-19 ची परिस्थिती आणि नागरिकांच्या हितासाठी आम्ही 24 जुलै रोजी रात्री 8 वाजल्यापासून 10 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे' असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे.
तसेच, मध्यप्रदेशात यावर्षी 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनी कोणतेही पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, असे राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले आहे.