हैदराबाद - कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरात शुक्रवारी सर्वाधिक 19 हजार 906 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 410 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 28 हजार 859 वर पोहोचली आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 3 हजार 51 वर पोहोचली आहे. तर 3 लाख 9 हजार 713 रुग्ण बरे झालेले आहेत. तसेच 16 हजार 95 बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने दिली.
- दिल्ली -
रिमॅपिंग केल्यानंतर दिल्लीतील कंटेनमेंट झोनची संख्या 417 वर पोहोचली आहे. तर जवळपास 2 लाख 45 हजार लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. केंद्राच्या निर्देशानुसार काही जिल्ह्यातील अधिकाऱयांनी असे कंटेनमेंट झोन पुन्हा तयार करण्याचे काम अद्याप पूर्ण केलेले नाही. यामुळे कंटेनर झोनची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. रिमॅपिंग करण्याआधी कंटनेमेंट झोन्सची संख्या 280 वर होती.
- महाराष्ट्र -
राज्यात 30 जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात काही ठिकाणी निर्बंध असतील. मात्र, काही ठिकाणी हळूहळू सवलत दिली जाईल.
राज्यात रविवारी सर्वाधिक 5 हजार 493 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 156 बाधितांचा मृत्यू झाला. देशात सर्वाधिक जास्त कोरोनाबाधित असलेल्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 64 हजार 626 वर पोहोचला आहे.
- राजस्थान -
राज्यातील ढोलपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येत वाढ झाली आहे. अहवालानुसार, जिल्हा कारागृहातील डझनभर कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. प्रशासनाकडून तीन दिवसांपूर्वी 70 नमुने चाचणीसाठी जमा करण्यात आले होते. आतापर्यंत एकूण 20 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
- मध्यप्रदेश -
कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकार 1 जुलैपासून किल कोरोना ही मोहीम राबविणार आहे. 15 दिवसांच्या या मोहीमध्ये जवळपास अडीच लाख लोकांची चाचणी केली जाईल आणि एका दिवसाला 15 ते 20 हजार जणांचे नमुने गोळा करण्यात येतील.
या मोहीम अंतर्गत, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच इतर रोगांच्या चाचण्या करण्यात येणार आहे.
- ओडिशा -
राज्यात आणखी 3 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच एकूण मृतांची संख्या 21 वर पोहोचली आहे. तर 264 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यात एका राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) जवानाचाही समावेश आहे. याबरोबरच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 614 वर पोहोचली आहे.
- हिमाचल प्रदेश -
30 जूनला शालेय सुटी संपत असल्याने राज्यातील शिक्षण ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी सज्ज झाले आहे. याशिवाय शिक्षकांना ऑनलाईन वर्गांची तयारी करून आवश्यक साहित्य तयार करण्याचे सांगितले आहे.नियमित शाळा सुरु करण्याचा निर्णय कोरोनाची परिस्थिती बघून होणार आहे.
- उत्तराखंड -
राज्यात जवळपास 8 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यात ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयामधील एका निवासी डॉक्टरचा समावेश आहे. तर याबरोबरच राज्यातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 2 हजार 823
- झारखंड -
राज्यात रविवारी 66 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. याबरोबरच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 360 वर पोहोचली आहे.