ETV Bharat / bharat

देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी... वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र पोलिसांमध्ये गेल्या 48 तासांत 140 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका पोलिसाचा मृत्यूही झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित एकूण पोलिसांचा आकडा 3,960 वर पोहोचला आहे. तर 2,925 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

covid-19-news-from-across-the-nation
देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी..
author img

By

Published : Jun 21, 2020, 6:20 AM IST

हैदराबाद - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरात शुक्रवारी एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3,95,048 वर पोहोचला असून मृत्यूचा आकडा 12,948 झाला आहे. तर आतापर्यंत 2,13,830 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

covid-19-news-from-across-the-nation
देशभरातील कोरोनाची आकडेवारी...

दिल्ली

प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला आता राष्ट्रीय राजधानीत कमीतकमी पाच दिवस क्वारंटाईन केंद्रामध्ये रहावे लागेल. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार हा आदेश जारी केला आहे. या निर्णयानंतर दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार पुन्हा एकदा समोरासमोर दिसले आहेत. यावर दिल्ली सरकारने आक्षेप घेतला आहे. क्वारंटाईनच्या भीतीने लोक कोरोना चाचणी करण्यास टाळतात असे दिल्ली सरकारचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र

महाराष्ट्र पोलिसांमध्ये गेल्या 48 तासांत 140 जणांना कोरोनाची लागण झाल आहे. तर एका पोलिसाचा मृत्यूही झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित एकूण पोलिसांचा आकडा 3,960 वर पोहोचला आहे. तर 2,925 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 31 जणांचा मृत्यृ झाला आहे.

दरम्यान, राज्यभरात कोरोनाचा झपाट्याने प्रसार वाढत आहे. शनिवारी ३८७४ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी १३६ रुग्ण मुंबईतील आहेत. सध्या राज्यात ५८ हजार ५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर १३८० रुग्णांनी शनिवारी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्के एवढा आहे. शनिवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ५४ हजार नमुन्यांपैकी १ लाख २८ हजार २०५ नमुने पॉझिटिव्ह (१७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कर्नाटक

राज्याच्या आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार, आता ज्या प्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे असेच वाढत राहीले तर येत्या 15 ऑगस्टपर्यंत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांवर जाईल. हा अंदाज आताच्या रुग्ण दुप्पट होण्याच्या दरावर आधारित आहे. मात्र, जर सध्याच्या परिस्थितीत काही सुधारणा झाली तर, रुग्णांचा आकडा 50 ते 60 हजारांवर जाईल, असा अंदाज आहे.

तामिळनाडू

टीव्हीएस सुंदरम फास्टनर्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष नारायणस्वामी बालकृष्णन यांचे शनिवारी कोरोनामुळे निधन झाले.

राज्यात शनिवारी 2,396 रुग्णांची वाढ झाली असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी वाढलेल्या आकडेवारीसह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 56,845 वर पोहोचला आहे. तर शनिवारी 1,045 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 24,822 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशमधील भाजपच्या एका वरिष्ठ आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. या आमदारासह त्यांच्या पत्नीनालाही कोरोनाचा लागण झाल्याचे अहवालात समोर आले आहे. दरम्यान, राज्यात राज्यसभा निवडणुकीसाठी या आमदाराने मतदान केले. त्यानंतर त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. मध्य प्रदेशातील आता दोन आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे.

आमदाराला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या संपर्कातील इतर आमदारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही आमदारांनी स्वत:ची रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करुन घेतली आहे.

उत्तराखंड

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासमवेत व्हर्चुअल बैठक झाली. कावड यात्रेवरुन झालेल्या या बैठकीत सर्वांच्या संमतीने यावर्षीची यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजस्थान

राजस्थान सरकारने कोरोना चाचणीसाठी आणि कोरोना रुग्णांवर उपचासाठी दर निश्चित केले आहेत. यानुसार खासगी लॅबमध्ये कोरोना तपासण्याची 2,200 रक्कम निश्चित केली आहे. तसेच खासगी रुग्णालय सामान्य बेडसाठी दररोज 2,000 पेक्षा तर व्हेंटिलेटरसह आयसीयू बेडसाठी 4,000 पेक्षा जास्त रक्कम आकारता येणार नाही. जर कोणी जास्त रक्कम आकारली तर त्या रुग्णालयावर कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.